राजेश खन्ना यांची नात दिसते खूपच सुंदर; करते हे काम

मुंबई | 90 तसेच 80 च्या दशकातील कलाकारांची कामगिरी आपण सर्वांनी पाहिलेली आहे. त्यामुळे आता या कलाकारांची मुलं नेमकी काय करतात. तसेच त्यांना असलेले नातू देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत का? अशा अनेक गोष्टींची माहिती चाहत्यांना ठेवावी वाटते. अभिनेते राजेश खन्ना यांनी बॉलीवूडवर दीर्घकाळ राज्य केले. त्यांचा हँडसम लुक त्याकाळी अनेक अभिनेत्रींना घायाळ करत होता. अशात आता राजेश खन्ना यांच्या नातीचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

राजेश खन्ना यांच्या दोन मुली ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या आहेत. ट्विंकल खन्नाची बहीण आणि अभिनेत्री रिंकी खन्ना हिचे बॉलिवूड करिअर खूपच लहान राहिले. रिंकी खन्नाने ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत डिनो मोरिया आणि संजय सुरी देखील मुख्य भूमिकेत होते. यानंतर ती ‘मुझे कुछ कहना है’, ‘जिस देश में गंगा राहत है’, ‘झंकार बीट्स’ सारख्या काही चित्रपटांमध्ये दिसली. पण बॉलीवूडमध्ये ती अधिक पकड बनवू शकली नाही.

अभिनयात नशीब आजमावल्यानंतर तिने 2003 मध्ये उद्योगपती समीर सरनशी लग्न केले आणि परदेशात स्थायिक झाली. त्याचबरोबर रिंकी खन्नाची मुलगी नौमिका ही सध्या चर्चेत आली आहे. अलीकडेच ट्विंकल खन्नाने बहीण रिंकी खन्नाच्या वाढदिवशी तिची मुलगी नौमिकासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ट्विंकल खन्नाची पोस्ट पाहिल्यानंतर नाविकाला पाहून लोकांना सुपरस्टार राजेश खन्ना आठवले.

नाविकाने आपल्या स्टाईलमुळे लहान वयातच खूप लोकप्रियता मिळवली आहे. नाविका इतकी स्टायलिश आणि क्यूट आहे की लोकांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला आहे. तिचे डोळे अगदी राजेश खन्ना यांच्या सारखे आहेत. त्यामुळे तिचे फोटो पाहून अनेकांना तिचे आजोबा राजेश खन्ना यांची आठवण आली.

नाविका सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसली तरी तिला चित्रपटांची खूप आवड असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर ट्विंकल खन्नाच्या पोस्टनंतर इंटरनेट युजर्सनीही तिच्याबद्दल सर्च करायला सुरुवात केली आहे. सध्या नाविका तिच्या अभ्यासात व्यस्त आहे. ती पुढे अभिनयात येईल की नाही? हे येणारा काळच आपल्याला सांगू शकेल.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *