‘क्यू की सास भी कभी बहू थी’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचे झाले निधन

दिल्ली| हिंदी आणि गुजराती मालिका आणि कार्यक्रमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते रसिक दवे यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता निधन झाले. किडनी निकामी झाल्याने अभिनेत्याने मुंबईत अखेरचा श्वास घेतला. रसिक दवे हे ‘महाभारत’मधील ‘नंदा’ या पात्रासाठी विशेष ओळखले जात होते. तसेच ते ‘संस्कार धरोहर अपना की’, ‘सीआयडी’, ‘कृष्णा’ सारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही शोचे भाग राहिले आहेत. हिंदी मालिका विश्वासह त्यांनी गुजराती मालिका विश्व देखील प्रचंड गाजवले आहे. गुजराती मालिका विश्वातील ते एक प्रसिद्ध स्टार होते.

 

रसिक दवे हे जवळपास दोन वर्षांपासून डायलिसिसवर होते. त्यामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा रुग्णालयात जावे लागत असे. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना १५ दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंधरा दिवस त्यांच्यावर डॉक्टर आणि शर्थीचे उपचार केले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यामध्ये अपयश आले. आणि रसिक दवे यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

 

रसिक दवे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवरती सुख काळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी केतकी रिद्धी आणि अभिषेक ही दोन मुले आहेत. रसिक यांनी ’82’ मध्ये ‘पुत्र वधू’ या गुजराती चित्रपटातून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी गुजराती-हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये काम केले आहे. रसिक दवे यांच्या पत्नी केतकी या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मालिकेने त्यांना विशेष प्रसिध्दी मिळाली.

 

केतकी आणि रसिक यांची जोडी ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती. केतकी यांच्या आई सरिता जोशी याही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि तिचे वडील (दिवंगत) प्रवीण जोशी थिएटर दिग्दर्शक होते. त्यांना एक धाकटी बहीण पूरबी जोशी आहे जी एक अभिनेत्री आणि अँकर देखील आहे. रसिक आणि केतकी दवे यांनी गुजराती थिएटर कंपनीही चालवली आहे. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *