अभिमानास्पद! वेटरचे काम करता करता दिली परीक्षा, सहा वेळा अपयश मिळवून सातव्या वेळी झाले आयएएस अधिकारी….

मुंबई | जिद्द आणि मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण करण्याचं धाडस प्रत्येक तरुण करत असतो. त्यासाठी लागणारी मेहनत अपार कष्ट घेण्याची पूर्ण तयारी असते. यात अनेक तरुण आयएएस आणि आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. निश्चितच या दोन्ही पदांसाठी करावा लागणारा अभ्यास आणि मेहनत ही खूप मोठी आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करूनही अनेक मुलं या परीक्षेत यश मिळवू शकत नाही. अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात तर काहीजण हाताश होऊन जीव देखील देतात. मात्र असं करून कोणत्याही अडचणी सोडवता येत नाहीत. आपल्याला आपल्या आयुष्यात असलेल्या

अडचणींपासून दूर जाण्यासाठी शिक्षणच काम येते. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीतून पळ न काढता तिच्याशी दोन हात करून यश मिळवणे गरजेचे आहे. याचीच प्रचिती कधीकाळी वेटरचे काम करणाऱ्या जयगणेश यांना आली.

तमिळनाडू राज्यातील आयएएस अधिकारी जयगणेश यांनी मोठ्या परिश्रमाने हे यश संपादन केले आहे. घरची परिस्थिती तितकीशी बरी नसल्याने त्यांना खूप मेहनतीने ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागली. सलग सहा वेळा ते यूपीएससी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले. मात्र काही करून त्यांना अधिकारी व्हायचे होते. मनातली जिद्द पेटून उठली होती. एवढ्या पुढे येऊन पुन्हा मागे जाणे त्यांना मान्य नव्हते. मात्र आर्थिक चचन भासत असल्याने परिस्थितीने त्यांना हॉटेलमध्ये वेटरचे काम करायला भाग पाडले.

कोणतीही लाज न बाळगता एवढ्या बुद्धिमान व्यक्तीने हॉटेलमध्ये वेटरचे काम देखील केले. याच दरम्यान त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोची परीक्षा दिली. यामध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले. त्यांना नोकरीची ऑफर मिळाली मात्र आयएएस अधिकारी होण्याच्या स्वप्नाने त्यांना पेचात टाकले. त्यामुळे त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोची नोकरी नाकारून पुन्हा एकदा एमपीएससी साठी प्रयत्न केला. यावेळी हॉटेलमधील काम संपल्यानंतर संपूर्ण वेळ ते अभ्यासाला देत होते. अशात सातव्या प्रयत्नात त्यांना यश आले. त्यांचा 156 वा रँक आला.

उत्तर प्रदेशातील अंबर जवळ येथील एका लहानशा गावातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले होते. बारावी त्यांना 91 टक्के गुण मिळाले. त्यानंतर पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण त्यांनी घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना दरमहा 2500 रुपयांची नोकरी मिळाली. यात आपले घर चालणार नाही याची त्यांना कल्पना होती त्यामुळेच त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. आता जयगणेश यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी बनला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *