प्रियंका चोप्रान या देशाच्या उपराष्ट्राध्यक्षाची घेतली मुलाखत

मुंबई | प्रियंका चोप्रान आपल्या करीअरची सुरुवात बॉलिवूडमधून केली. एवढच नाही तर ती तिच्या स्वकष्टान हॉलिवूडमध्ये आपल्या कामाची छाप पाडत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत ती पाणी पुरी खाताना एन्जॉय करतानाचे फोटो तिन सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. ती सध्या न्यूयॉर्कमध्ये आपल्या संसारासह आपले काम अशी दुहेरी भूमिका निभावत आहे. आता परत एकदा प्रियांका चर्चेत आलीये. प्रियांकान चक्क अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची मुलाखत घेतलीये. त्यामुळं ती आता चांगलीच चर्चेत पहायला मिळतेय.

अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये प्रियंका चोप्रा आणि कमला हॅरिस यांची चर्चा रंगली होती. तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. एवढच नाही तर त्या व्हिडिओमध्ये काय प्रश्न केले आहेत हे देखील समजते. भारतात काही ठिकाणी स्त्री पुरुष यांना समान वेतन दिल जात. परंतु काही ठिकाणी स्त्रियांना कमी तर पुरुषांना अधिक वेतन दिलं जातं.

काय म्हणाली प्रियंका: भारतात बऱ्याचदा वेतनाबाबत स्त्री पुरुष समानता ही बाब काही ठिकाणी लागू होते; तर काही ठिकाणी स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन दिलं जातं. त्यावर प्रियंका चोप्रा म्हणाली की; मी गेली 22 वर्षे काम करत आहे. आज पहिल्यांदा मला पुरुषांच्या तुलनेत वेतन मिळालं आहे. असे त्या व्हिडिओमध्ये देखील पहायला मिळतय. विशेष बाब म्हणजे जेंव्हा प्रियांका चोप्रा कमला हॅरिस यांची मुलाखत घेत होती, त्यावेळी प्रियांकाचा पती निक जोनस मुलगी मालती मेरी चोप्रा जोनसला सांभाळताना दिसला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *