प्रदीप पटवर्धन यांची होती वेगळीच छाप; गिरगावकर कधीच विसरू शकणार नाहीत

मुंबई | दिग्गज अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. प्रदीप पटवर्धन हे मूळचे गिरगाव येथील. येथेच त्यांचे बालपण गेले आणि त्यांचा मृत्यू देखील इथेच झला. कायमच आपल्या कामाशी प्रामाणिक आणि प्रसिद्धीचा कधीच बडेजाव न करणारे असे प्रदीप पटवर्धन आज आपल्यात नाहीत. आज या बातमीतून त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊ.

प्रदीप पटवर्धन हे एका बँकेत नोकरी करायचे. त्यांच्या आईची अशी इच्छा होती की, त्यांनी नोकरी कधीच सोडू नये तसेच त्यांनी नाटक देखील करावे. लहापणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. पुढे महाविद्यालयात शिकत असताना एकांकिका करत त्यांची ही आवड अधिक वाढली.

त्यामुळे त्यांनी पुढे याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मग त्यांनी व्यावसायिक नाटकांच्या साहाय्याने मंच गाजवायला सुरुवात केली. त्यांचा अभिनय नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये अभिनय केला. अशात त्यांच्या निधनाने संपूर्ण गिरगाव रडलं होतं.

कारण कोणताही सन असला तरी प्रदीप यांनी आपल्या जुन्या घराशी असलेली नाळ कधीच तोडली नव्हती. कोणताही सण असला की, ते या सणाला आपल्या जुन्या घरी जात होते. अगदी साधी राहणी त्यांची होती. त्यांना नेहमीच साधेपणात राहायला आवडायचे. प्रत्येक सण ते मोठ्या उत्साहाने साजरा करायचे. अनेक वेळा तर त्यांनी गिरगाव ते सीएसटी असा प्रवास बसने देखील केला आहे.

कितीही प्रसिध्दी मिळाली तरी त्यांना सामान्य व्यक्ती प्रमाणे राहणे अवडत होते. गिरगावात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. प्रदीप या प्रत्येक कार्यक्रमात खूप नाचायचे डिजेवर नचाण्यापेक्षा त्यांना वेगवेगळ्या वाद्यांवर नाचायला खूप आवडायचे. डोक्यावर घट्ट पट्टी बांधून गोविंदा रे गोपाळा या गणायावर नाचून ते नुसती धमाल उडवून द्यायचे.

ते नाचत असताना कॉलिनितील अनेक तरुणी खिडकी आणि बळकबिमध्ये त्यांना पाहण्यासाठी गर्दी करायच्या. प्रदीप यांच्या याच स्वभावामुळे त्यांचा चाहता वर्ग फार मोठा होता. त्यांचे मोरूची मावशी हे नाटक खूप गाजले होते. या नाटकाचे दीड हजाराहून अधिक प्रयोग झाले होते. तसेच टूर टूर, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी ही नाटके देखील खूप गाजली होती. कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये देखील ते दिसले होते.

एका उत्तम अभिनेत्या प्रमाणे ते एक उत्तम निर्माते देखील होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘लावू का लाथ’,‘एक फुल्ल चार हाफ’, ‘गोळा बेरीज’, ‘डान्स पार्टी’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘नवरामाझा नवसाचा’, ‘चष्मे बहाद्दर’,‘ भुताळलेला’, ‘परीस’ l ‘डोम’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’, या चित्रपटांमध्येही दमदार अभिनय केला आहे. तसेच ‘पोलीस लाईन एक पूर्ण सत्य’, ‘होल्डिंग बॅक’, ‘थँक यू विठ्ठला’, ‘मेनका उर्वशी’, ‘१२३४’ या चित्रपटांसाठी निर्मितीचे काम केले होते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *