‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेच्या पोस्टर्सने धुमाकूळ; ही प्रसिध्द अभिनेत्री करतेय काम

मुंबई | झी मराठी नेहमीच रसिका प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या मालिका घेऊन येत असते. या वाहिनी वरती आता बऱ्याच नवीन मालिका येऊ घातल्या आहेत. त्यातीलच एक नवीन मालिका म्हणजे “नवा गडी नवा राज्य”. या मालिकेचा फर्स्ट पोस्टरनेच चांगली हवा केली होती. ज्यावेळी याचे पहिले पोस्टर समोर आले तेव्हा सर्वच जण काही मिनिटांसाठी सुन्न झाले होते. तर या मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एन्ट्री होत आहे.

अभिनेत्री अनिता दाते हिने पहिले माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काम केले. त्यानंतर काही काळाचा छोटा ब्रेक घेऊन तिने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं आहे. तिचा नवा गडी नवा राज्य मालिकेतील पहिला फोटो पाहून सगळेच गोंधळात पडले होते. मात्र नंतर या मालिकेचा प्रोमो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून दिली.

आता या मालिकेत ती रमा ही भूमिका साकारणार आहे. फोटोमध्ये तिचे सर्व सीन आहेत. यातूनच ती संवाद साधताना दिसणार आहे. तसेच ती या घरची सून असते. मात्र तिच निधन झाल्यामुळे तिचा नवरा दुसरा लग्न करतो. आणि या घरात आनंदी म्हणजेच अभिनेत्री पल्लवी पाटीलची एन्ट्री होते. त्यामुळे आता आनंदीला पती सासू आणि मुलगी या तिघांची मने जिंकायची असतात.

आनंदी हे पात्र अभिनेत्री पल्लवी पाटील साकारणार असून मराठी मराठी सिनेसृष्टी नवीन आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. तशी ती या आधीच मनोरंजन विश्वात एन्ट्री केली आहे. मात्र 2017 नंतर ती अभिनय क्षेत्रात दिसलीच नाही. त्यामुळे आता नवा गडी नवा राज्य या मालिकेतून ती दमदार कमबॅक करताना दिसते.

पल्लवी पाटील ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री अाहे. पल्लवीचा जन्म धुळे येथे झाला असून तिचे मुळ गाव जळगाव जिल्ह्यातील आहे, पल्लवी पाटील हिने तिचे शालेय शिक्षण सर्वोदय माध्यमिक विद्यालय येथून केले, तर उच्चमाध्यमिक शिक्षण प्रताप कॉलेज, अमलनेर येथून केले. त्यानंतर डी वाय पाटील महाविद्यालयातून आर्किटेक्ट ही पदवी मिळवली.

क्लासमेट या चित्रपटातून तिने या क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर २०१५ मद्धे आलेल्या क्लासमेट्स या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट श्रुष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशाने पल्लवीला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. तिने क्लासमेट, ७०२ दीक्षित, शेंटीमेंटल या चित्रपटांमध्ये काम केल आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *