कीर्तनकार शिवलीला पाटील ने दिली ‘गुडन्यूज’, एक नव्हे तर दोन पाहुण्यांचे घरी आगमन

कलर्स मराठी वर झालेल्या बिग बॉसच्या तिसऱ्या परवामध्ये सहभागी झालेल्या कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. कारण की शिवलीला पाटील यांच्या घरी एक नव्हे तर दोन पाहुण्यांचे आगमन झाले आहे. आपल्याला वाटले असेल की हा काय प्रकार आहे.

याबद्दलच आम्ही आपल्याला या लेखांमध्ये माहिती देणार आहोत शिवलीला पाटील बिग बॉस शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. बिग बॉस 3 सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर यांनी केले होते. या शोमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले. विशाल निकम याने हा शो जिंकला होता. तर जय दुधाने हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता.

तर विकास पाटील याने देखील दमदार कामगिरी केली होती. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मात्र, यामध्ये शिवलीला पाटील आणि भूमाता ब्रिगेडच्य अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. या शोमध्ये अविष्कार दार्वेकर, त्याची घटस्फोटीत पत्नी स्नेहा वाघ, मीनल शहा, सोनाली पाटील, मीरा जगन्नाथ, दादुस, सुरेखा कुडची यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
मात्र, शिवलीला पाटील हिने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. शिवलीला पाटील या शो मध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी ताप आल्याचा बहाना करून नंतर यासह मधून काढता पाय घेतला. याचे कारण म्हणजे शिकलेला पाटील याच्यावर अनेकांनी टीका केली होती. कारण एका कीर्तनकार महिलेने अशा प्रकारे एखाद्या रियालिटी शोमध्ये सहभागी होऊन समाजाची बदनामी करू नये.

वारकरी संप्रदायाची बदनामी करू नये, असे म्हणत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवलीला पाटील ही या शो मधून बाहेर पडली होती. तिने नंतर पंढरपूर मध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जाहीर माफी मागून वारकरी संप्रदायाच्या जर माझ्यामुळे भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागते, असे म्हटले होते. एकूणच काय शिवलीला पाटील ही कायमच चर्चेत असते.


आता देखील त्या चर्चेत आल्या आहेत. याचे कारण म्हणजे शीवलीला पाटील यांच्या घरी एक नाहीतर दोन पाहूण्याच्या आगमन झाले आहे. आपल्याला वाटत असेल की हा काय प्रकार आहे तर आम्ही आपल्याला माहिती देतो. शिवलीला पाटील हिने दोन गाड्या खरेदी केल्या आहेत. एक फोर व्हीलर गाडी खरेदी केली आहे, तर दुसरी गाडी टू व्हीलर आहे.
या गाड्या अतिशय महागड्या आहेत. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडिया अकाउंट वरून दिली आहे. माझ्या घरी दोन पाहुण्यांचे आगमन झाले आहे, असे तिने म्हटले आहे आणि टू व्हीलर सोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यांच्या फोटोला अनेकांनी लाईक आणि शेअर देखील केले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *