पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट

मुंबई | बॉलिवूडविश्व असेल नाहीतर क्रिकेटविश्व या ठिकाणी काय घडेल काय बिघडेल हे सांगता येत नाही. अशावेळी आता पाकिस्तानची सून भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिन शुक्रवारी एक पोस्ट शेअर केली या पोस्टवरून अनेक चर्चांना उधाण आलेलं दिसतंय. तिन आपल्या मुलाचा फोटो शेअर करून लिहलं की; हा काळ माझ्यासाठी फारच कठीण जात आहे. यावरून अनेक चर्चांना तोंड फुटलं.

 

 

 

पती शोएब मलिक हा पाकिस्तानमध्ये क्रिकेटक्षेत्रात मैदानाबहेर राहून काम करत आहे. तसेच सानिया ही सध्या दुबईमध्ये असल्याचं समजतंय. नेमकं हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं की काय अशी चर्चा सुरू आहे. काही पाकिस्तान वृत्तसंस्थेनं घटस्फोट फायनल झाल्याच सांगितलं. तर काहींनी यावर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. मलिकच्या मॅनेजमेंट विभागातील व्यक्तीला काही वृत्तसंस्थानी विचारले असता त्या व्यक्तीनं घटस्फोट फायनल झाल्याच सांगितलं.

 

 

तो आता दुसऱ्याच मुलीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. तरी ही या दोघांचा घटस्फोट झाला आहे की नाही यावर अजूनही थोड पुरावा समोर आलेला नाही. वृत्तासमोर अजूनही दोघांनी खर खोटं काहीच सांगितलं नाही. शोएबने अका शोमध्ये सानियाची फसवणूक केल्याचा डाव देखील केला होता. अस सांगण्यात येतंय. तसेच पाकिस्तानी वृत्तसंस्थेनं या दोघांनी घटस्फोट घतला असल्याचं म्हंटल जातंय. यावर अजूनही पुरावा नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *