पाकिस्तानला धूळ चाटविनाऱ्या संघाला भारतानं 36 बॉलमध्ये गुंडाळल; महीला संघाने केला आणखी एक पराक्रम

थायलंड | (Ind vs thai wom cup) – भारतीय महिला संघान थायलंडविरुद्ध चांगली कामगिरी केलीय. 14 षटक राखून विजयी मिळवला आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. या वर्षीच्या पॉईंट टेबलवर 10 गुणांसह भारतीय क्रिकेट महिला संघाला अव्वल स्थान मिळवण्यासाठी कुणीही रोखल नाही. सिब्बिनेनीने ( 20) नाबाद तसेच पूजा वस्त्राकर यांनी (12) नाबाद अशी खेळी खेळून सहा षटकात एक बाद होऊन त्यानंतर भारतीयांनी विजयाचा शिक्कामोर्तब केला.

काही दिवसापूर्वी थायलंडने पाकिस्तानचा पराभव केला होता. परंतु आता भारतानं त्याच थायलंडला पराभवाच्या गर्तेत ढकलल. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट टीम आपला खेळ दाखवते. स्मृती नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. हरमनप्रित कौर हिन आतापर्यंत 135 सामने खेळले आहेत. तर स्मृतीचा हा 100 सामना होता.

थायलंडच्या एकही फलंदाजाला दुहेरी धावा काढता आल्या नाही – थायलंडच्या नन्नपट शिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी अंकात धावसंख्या काढता आली नाही. नन्नपटनही केवळ 12 धावा केल्या. स्नेह रणाने नऊ धावा देत 3 गडी बाद केले. दीप्ती शर्माने 10 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. राजेश्वर गायकवाड यांनी 2 विकेट्स तर मेघना सिंगने एक विकेट घेतली.

कमी चेंडू राखून भारतीयांनी केली आत्तापर्यंत ही कामगिरी – थायलंड विरुद्ध भारतानं 84 रुपयांनी विजय मिळवला. तसेच 2019 साली भारतानं अवघे 58 चेंडू राखीव ठेऊन विजय मिळवला. 2021 साली भारतीय क्रिकेट महिला संघान 54 चेंडू राखून दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *