पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर?

 

दिल्ली | सध्या क्रिकेटमध्ये नवीनच वाद सुरू झाला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांचा परिणाम आणि दबाव दोन्ही देशांमधील क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट सामन्यांवर पडतोय. नुकताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तान होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी पुढील वर्षी आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिल्यानंतर तणाव निर्माण झालाय.

 

बीसीसीआयच्या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील 2023 मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा गंभीरपणे विचार करतेय. भारताच्या निर्णयानंतर पीसीबीने आशियाई क्रिकेट परिषदेतून बाहेर पडण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे. आशिया कप स्पर्धेच्या निमित्तानं आता भारत आणि पाकिस्तान नियामक मंडळ आमनेसामने आहेत.

काय आहे नेमका आशिया कप वाद – पुढील वर्षी होणारा आशिया कप 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. आशियाई क्रिकेट परिषदेन भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच यजमानपद सोपवलय. योगायोगान बीसीसीआयचे सचिन जय शाह आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर अनेक क्रिकेट वेबसाइट्सनी शाह यांचा हवाला देत म्हटले होते की, “आम्ही निर्णय घेतलाय. आम्ही तटस्थ ठिकाणी सामने खेळू.”

 

श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतेय. साहजिकच श्रीलंका क्रिकेट मंडळावरदेखील याचा दबाव आणि परिणाम झालाय. त्यामुळे यजमान श्रीलंकेन आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक 2022 चे आयोजन करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यानंतर ते संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आयोजित करण्यात आले.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *