पद्मश्री सन्मानित या गाजलेल्या अभिनेत्याचे झाले निधन …

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वाशी निगडित अनेक व्यक्ती या जगाचा निरोप घेत आहेत. काही संगीतकार तर काही अभिनेते आणि काही अभिनेत्री आपल्याला कायमचे सोडून गेले आहेत. अशात यामध्ये काहींचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. तर काहींनी आत्महत्या तर काहींची हत्या करण्यात आली आहे. अशात संगीत विश्वातील आणखी एका दिग्गज गायकाचा मृत्यू झाला आहे. पंजाब मधील कवी सुरेश शर्मा यांचे निधन झाले आहे.

त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. सुरेश शर्मा हे एक विनोदी कवी, अभिनेते तसेच लेखक होते. त्यांनी पंजाबी भाषेत अनेक गाणी आणि कविता लिहिल्या होत्या. आपल्या कविता ते विनोदी अंदाजात स्वतः च प्रेक्षकांसमोर सादर करायचे. अशात आता त्याचे निधन झाले असून त्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे त्यांचे चाहते अधिक चिंतेत आहेत. त्यांच्या मृत्यूच गूढ अद्याप अस्पष्ट असल्याने अनेक जण याच कारण शोधण्याची धडपड करत आहेत.

अशात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बरोबर चित्रपटांत धमाल करणारे जेष्ठ अभिनेते राजेंद्र कडकोळ यांचे देखील गेल्या वर्षी निधन झाले. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपटांत काम केले होते. त्यांना नेहमी सहायक कलाकाराच्या भूमिकेत पाहिलं गेलं होतं. यासह जेष्ठ अभिनेते विरा साथीदार यांनी देखील या जगाचा निरोप घेतला आहे.

मनोरंजन विश्वात दररोज कोणत्या ना कोणत्या कलाकारावर काळाचा आघात होताना दिसतो आहे. अशात मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख ही देखील नुकतीच मोठ्या दुःखातून सावरली आहे. साल २०२० मध्ये तिच्या पतीचे म्हणजेच आशुतोष भाकरे याचे निधन झाले होते. आपल्या पतीच्या निधनामुळे ती खूप खचून गेली होती. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्याने सात जन्माची गाठ बांधली तो एक जन्मही तिची साथ देऊ शकला नाही. साल २०१६ मध्ये त्या दोघांचा विवाह झाला होता. त्यानंतर ४ वर्षांतच या दोघांचा सुखी संसार मोडला. अभिनेत्री आता हळूहळू या दुखःतून सावरत आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. गिरीश ओक यांच्या आईचे देखील वृद्धापकाळाने निधन झाले. आई म्हणजे सगळ्यात मोठा आधार असतो. आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी आई बरोबर असली की, सहज सोडवता येतात. मात्र आईचे छत्र गिरीश यांच्या पासून दूर गेले. त्यामुळे ते खूप खचले होते. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या आईच्या निधनाची पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी अनेकांनी त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली होती.

रमया वस्तावया, लेके पहला पहला प्यार अशा सदाबहार गाण्याने बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शिला वाझ. त्यांनी १९५० च्या दशकात आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घातली. मात्र आता त्या या जगात नाहीत. २९ जून रोजी त्यांचे निधन झाले. अशात आता हॉलिवूड अभिनेता पिटर स्टेफिंग पॉल रुफ या अभिनेत्याचे निधन झाले.

भातासाठी हा कलाकार फार जवळचा आहे. कारण त्याने महाभारताचा तब्बल ९ तासांचा प्रयोग केला होता. त्यामुळे त्याला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. २ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९७ वर्षांचे होते. पिटर हे एक असे कलावंत होते ज्यांना कधीच मोठ्या रंगमंचाची गरज नसती.

स्वतःचा मंच ते स्वतः बनवत होते. ज्यासाठी त्यांना फक्त मोकळी आणि लख्ख प्रकाश असलेली जागा पाहिजे होती. १९८५ मध्ये युद्ध सुरू असतानाच त्यांनी महाभारत हे नाटक केले होते. त्यामुळे संपूर्ण जगभरात त्यांची प्रसिध्दी झाली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *