अरेव्वा! सखी गोखलेनी दिली गुड न्यूज…

मुंबई | मराठी अभिनय क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून गुड न्युजचा सपाटा सुरू असलेला दिसतो आहे. आता कलाकार आणि त्यांच्या गुडन्यूज म्हटल्यावर सर्वांनाच त्या ऐकाव्याश्या वाटतात. अशात आता अभिनेत्री सखी गोखले हिने एक सुदंर अशी गुड न्यूज दिली आहे. तिची गुड न्यूज ऐकून सगळेच तिचं कौतुक करत आहेत.

सखी गोखले म्हणजे दील दोस्ती दुनियादारी या मालिकेत दिसलेली अभिनेत्री. जी नेहमीच शांत होती. लग्न करून मुंबईत आली आणि नवऱ्याने तिला टाकून दिलं. त्यानंतरचा तिचा आणि तिच्या मित्रांचा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला होता. या मालिकेतून सखी खूप प्रसिद्ध झाली. अशात आता तिची गुड न्यूज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सखी गोखले हिने सौरत जोशी बरोबर विवाह केला. या दोघांचा विवाह साल २०१९ मध्येच संपन्न झाला. सध्या दोघेही लंडनमध्ये राहत आहेत. या दोघांच्या प्रेमाची चर्चा ही दील दोस्ती दुनियादारी या मालिकेपासूनच सुरू झाली होती. कारण या मालिकेत सौरत देखील अभिनय करत होता.

सखी ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे. अगबाई अरेच्चा या चित्रपटामध्ये शुभांगी यांचा अभिनय सर्वांना आवडला. अशात त्यांनी अनेक मालिका आणि इतर चित्रपटात देखील काम केले आहे. त्याच्याच अभिनयाचा वारसा घेत सखी देखील अभिनयात आली.

तिने दिलेल्या गुड न्यूजमध्ये तिने एक मोठी झेप घेतली आहे. तिच्या यशाच्या या बातमीत तिने एक पोस्ट शेअर करत तिने क्युरेटिंग कंटेम्पररी आर्ट टीहीमध्ये मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवली असल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये पुढे तिने तिच्या आईचे खूप आभार मानले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *