वन नाईट स्टँडनंतर या अभिनेत्री बरोबर घडला हा विचित्र प्रकार

दिल्ली | कुर्बा सौते या अभिनेत्रीने नुकतेच “ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर” या तिच्या पुस्तकाद्वारे लेखिका म्हणून पदार्पण केले. सीक्रेट गेम या बेव सिरीजमधून कुर्बा प्रसिद्धी झोतात आली होती. लिहिलेल्या या पुस्तकात तिने तिच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केला आहे. अगदी शरीराच्या प्रतिमेच्या समस्येशी झुंज, सामाजिक चिंता, तिचा विनयभंग, अभूतपूर्व गर्भधारणा देखील शेअर केली आहे. नुकतीच तिने या बाबत एका मध्यामाला मुलाखत दिली आहे. तिची ही मुलाखत आता खूप व्हायरल होतं आहे.

तिच्या पुस्तकातील “मी आई व्हायला तयार नव्हते” या शीर्षकाच्या एका भागात, तिने 2013 मध्ये, जेव्हा ती अंदमानला सुट्टीवर गेली होती तेव्हाचा तिचा अनुभव शेअर केला. अभिनेत्रीने खुलासा केला की ती रात्री स्कूबा-डायव्हिंगला गेली होती, त्यानंतर तिने मद्यपान केलं होतं. त्यादिवशी एका मित्राबरोबर तिचे शारीरिक संबंध आले होते.

अशात काही दिवसांनंतर, तिची गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह आली कारण तिची मासिक पाळी चुकली होती. मुलाखतीत यावर सांगताना ती म्हणते की, “एका आठवड्यानंतर, मी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. मी त्यासाठी तयार नव्हते. जसं मी माझ्या आयुष्याची किंवा माझ्या प्रवासाची एक सुंदर कल्पना केली होती तशी ती नव्हती.” असं ती म्हणाली आहे.

टाइम्स डिजिटलला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, कूर्बाने या अनुभवाबद्दल खुलासा करत पुढे सांगितले की, ” मला त्यावेळी हा सर्व प्रकार खूप भयानक वाटला. मात्र आता माझ्या आयुष्यात त्यावेळी जे घडले त्याचा मला पश्चाताप नाही. मला कोणतीही खंत नाही. जेव्हा पहिल्यांदा मला हे समजले तेव्हा मी देखील खूप घाबरले होते. मात्र माझी भीती माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी, समाजाने वाढवली होती. ”

अभिनेत्रीचं असं म्हणणं आहे की, महिलांनी 23 व्या वर्षी लग्न करणे आणि 30 पर्यंत मूल जन्माला घालणे अशी प्लॅनिंग केली पाहिजे. कुर्बा त्यावेळी देखील यासाठी तयार नव्हती तिला तेव्हा मुलं नको होते आणि आजही तिला ते नको आहे.

तिच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेबद्दल तिने पुस्तकात सर्व काही लिहिले आहे. अशात मुलाखतीमध्ये तिने या सर्व गोष्टी आता का सांगितल्या आहेत असं विचारल्यावर तिने सांगितले की, तिला या सर्व गोष्टीमध्ये स्पष्टता हवी आहे. तिच्यावर आलेली परिस्थिती आणखीन कोणावर येऊ नये असं तिचं म्हणणं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *