बैल पोळ्याच्या दिवशीच सर्जा सोबत घडली मोठी दुर्घटना; वाचून डोळ्यात पाणी येईल

जळगाव | काल संपूर्ण राज्यात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्त सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बैलाला मस्त सजवले होते. नंदीबैलावर भंडारा उधळून अनेक जण या सण साजरा करत होते. यात जळगाव जिल्ह्यातील एका गावात मोठी दुर्घटना घडली. एका बैलाला यात खूप मोठी दुखापत होऊन त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. या घटनेने गावातील सर्व व्यक्ती हळहळ व्यक्त करू लागले.

जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथे हा प्रकार घडला. बैल पोळा सणानिमित्त सर्वांनी आपल्या बैलांना सजवले होते. सायंकाळ झाल्यावर त्यातील एक बैल पिसाळला. त्यानंतर इकडे तिकडे धावत असताना तो थेट एका घराच्या छतावर जाऊन पोहचला. यावेळी त्याला खाली घेण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू होते.

त्याला खाली घेण्यासाठी एक मुलगा वरती जाऊन त्याला खाली जाण्यास सांगत होता आणि रस्ता दाखवत होता. तर दुसरीकडे एक व्यक्ती पायऱ्यांवर उभा राहिला होता. बैल एकडे आला तर त्याला पटकन पकडण्यासाठी तो व्यक्ती शिडीवर उभा होता. यावेळी बैल पूर्णतः भारावून गेला होता. काय करावे त्याला समजत नव्हते. अशात घराच्या छतावरून त्याचा पाय निसटला आणि तो जोरात खाली आदळला.

यात खाली सिमेंटचा रस्ता असल्याने त्याच्या डोक्याला मार लागला आणि रक्त येऊ लागले. ऐन बैल पोळासणाच्या दिवशी हा प्रकार घडल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. त्यांनी त्या बैलाला तात्काळ पशू वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. वावडदा गावातील या घटनेने सर्व ग्रामस्थ बैलासाठी हळहळ व्यक्त करत आहेत.

या घटनेचा एक व्हिडीओ देखील शूट केला गेला. हा सर्व प्रकार तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता. अशात आणखी असाच एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. मात्र यात थोडा अजब प्रकार घडला आहे. एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आपल्या बैलांना घेऊन निघाला होता. यात त्याच्या बैलाला राग आला आणि त्याने आपल्या बेवड्या मालकाला शिंगावर घेऊन उडवून लावले. हा मजेशीर व्हिडिओ देखील अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

बैल पोळा हा सण सर्वच जण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गावात सर्व व्यक्ती दिवाळी प्रमाणे हा सण साजरा करतात. घरी पुरणपोळीचा नैवद्य केला जातो. यात सर्व व्यक्ती आपल्या बैलाला हा नैवद्य देतात. तसेच बैलाची पूजा करतात. सर्व बैल आपल्या शेतकऱ्याच्या मदतीत वर्षभर काम करतात शेतात राबतात मात्र या एकाच दिवशी बैलांची खूप मजा असते. मात्र काही गावामध्ये घडलेले हे प्रकार अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *