स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राची हास्य जत्रा आगळ्यावेगळ्या रूपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | गेल्या साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम अविरतपणे रसिक प्रेक्षकांची सेवा करत आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाने एक छोटा ब्रेक घेतला होता. त्यामुळे या कार्यक्रमाचे अनेक चाहते नाराज झाले होते. अशात या चाहत्यांची नाराजी आता मिटणार आहे. कारण तुमच्या टेन्शनवरची मात्र महाराष्ट्राची हास्य जत्रा तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.

हा कार्यक्रम बंद झाला त्यावेळी कार्यक्रमामध्ये काहीतरी नाविन्य आणण्यासाठी आम्ही ब्रेक घेत आहोत असं सांगण्यात आलं होतं. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये खरोखरच या कलाकारांनी आपल्या अभिनयात आणि संपूर्ण सेटमध्ये नाविन्य आणल्याचं दिसत आहे. कार्यक्रमाचा प्रमुख व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वायरल होत असलेल्या प्रमुख व्हिडिओमध्ये सर्वजण एका हॉस्पिटलमध्ये दिसत आहेत. तसेच हॉस्पिटलच्या परिसरात देखील हे विनोद वीर मजेशीर विनोद करत आहेत.

महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील विनोद पाहण्यासाठी प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरले होते. त्यामुळे त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार असून प्रोमो बरोबरच यातील कलाकारांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम आता दोन नाही तर आठवड्यातील चार दिवस पाहता येणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्यामुळे हास्यकल्लोळ आता दुप्पट अनुभवता येणार आहे. सदर कार्यक्रम 15 ऑगस्ट पासून रात्री नऊ वाजता फक्त सोनी मराठी या वाहिनी वरती पाहता येणार आहे.

कार्यक्रम सुरू होणार असल्याने चाहते पूर्णतः गहिवरून गेले आहेत. अनेकजण यावरती सुखद अश्रूंचे इमोजी देखील शेअर करत आहेत. यातील एका युजरने सुखद अश्रूंचे इमोजी शहर करत लिहिल आहे की, ” फायनली तुम्ही येत आहात गेले अडीच महिने तुम्हाला खूप मिस केलं.” तर यातील आणखीन एका युजरने म्हटले आहे की, ” खूप खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांची.

मुळात महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम कधीच बंद करू नका. इतर सर्व कार्यक्रम बंद केले तरी चालेल. मी घरात असताना सतत तेच तेच कार्यक्रम पाहते. अतिशय उच्च दर्जाची कॉमेडी, (नाहीतर तिकडे चला हवा येऊ द्या) फालतू शो.” सोशल मीडियावर येत असलेल्या या कमेंट मुळे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाची पसंती किती जास्त आहे हे समजते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *