शत्रूला संपवायला जाताना भयानक किंग कोब्राने सैनिकाची आडवली वाट, पुढे जे घडलं ते पाहून तुमचाही थरकाप उडेल…

मुंबई | आजवर चित्रपटांमध्ये तुम्ही अनेकदा खतरनाक स्टंट सीन पाहिले असतील. कधी कधी देशावर आधारित चित्रपटांमध्ये देखील स्टंट सीन दाखवले जातात. शत्रूशी दोन हात करताना जवान काय काय करतात हे दाखवले जाते. अशात काही सीनमध्ये तर जिंगली हिंस्र प्राणी सैनिकांच्या वाटेत येतात. मात्र सैनिक त्यांच्यावर देखील मात करत पुढे जातात.

 

अशात सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ देखील एका जवानाचा आहे. यात त्याच्या मार्गात एक विषारी किंग कोब्रा आला आला आहे. नुसत साप असं ऐकल तरी आपल्याला पळता भुई थोडी पडते. मग हा तर किंग कोब्रा. सगळ्यात विषारी सापांच्या जातीतला एक. ज्याच्या दंशाने मासून जागीच मृत्यू पावतो.

 

मात्र व्हिडिओमध्ये या जवानाने जे काही केलं आहे ते पाहून तुम्हाला देखील घाम फुटेल आणि तुम्ही त्याचं कौतुक कराल. सोशल मीडियावर समोर आलेला हा व्हिडिओ अगदी काही सेकंदांचा आहे. मात्र व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सैनिक जमिनीवर झोपून सरपटत एका हातात बंदूक घेऊन पुढे जात आहे. याच वेळी त्याच्या मार्गात हा किंग कोब्रा येतो. यावेळी सैनिक जराही न डगमगता आपला एक हात किंग कोब्राच्यावर नेतो. त्यानंतर तो हात हळूहळू जवळ आणतो. यावेळी त्याच्या जवळ आल्यावर सैनिक त्या कोब्राचा फना आपल्या हातांनी पडकतो आणि त्याला बरोबर घेऊन पुढे निघतो. एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात लांब लचक किंग कोब्रा खरोखर या सैनिकाचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ त्या सैनिकाच्या ट्रेनिंगमधील आहे की, खरोखर शत्रूशी दोन हात करतानाचा आहे हे मात्र समजू शकलेले नाही. मात्र हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील एका क्षणासाठी भीती वाटेल. निरंजन महापात्रा या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. काही वेळातच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर अनेक जण वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. तसेच सैनिकांवर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

 

आपल्या भारतमातेसाठी लढणारा प्रत्येक सैनिक हा देशाचे रक्षण करत असतो. मग मार्गात कोणीही आलं तरी त्याचं लक्ष तो बदलत नाही. मार्गात आलेल्यांना सोबत घेऊन किंवा तिथेच यमसदनी पाडून सैनिक पुढे जातात. त्यांच्या धाडसाने आपण देशात सुखरूप आयुष्य जगत असतो. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या धाडशी सैनिकाला आणि भारताच्या सर्वच सैनिकांना आमचा सलाम…

 

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *