इंद्राजींचं नाव घेते आता मन… दिपुच्या लग्नाची घाई

मुंबई | मालिका विश्वातील कलाकार आता लग्नाची घाई करताना दिसत आहेत. अशात आता लवकरच दिपू देखील बोहल्यावर बसणार आहे. यासाठी तिने आता पासूनच लग्नाची जंगी तयारी सुरू केली आहे. लग्नात असणाऱ्या सर्व विधिंमध्ये उखाणे घ्यावे लागतात त्यामुळे दिपू आता पासून या उखाण्यांची तयारी करते आहे.

मन उडू उडू झालं ही मलिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आली आहे. मालिकेमध्ये आता सनई चौघडे वाजणार आहेत. यामुळे दिपू आणि इंद्रा दोघे देखील खूप खुश आहेत. देशपांडे गुरुजींनी या दोघांच्या लग्नाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर दिपूचा एक उखाणा व्हायरल होत. तिचा हा उखाणा मालिकेच्या अवतीभोवती फिरताना दिसतो आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या उखाण्याची चांगलीच हवा होत आहे.

मन उडू उडू झालं या मालिकेत दिपू हे पात्र अभिनेत्री हृता दुर्गुळे साकारते. गेल्या महिन्यात तिने प्रतीक बरोबर लग्न केले. अशात आता मालिकेमुळे ती पुन्हा एकदा इंद्राच्या गळ्यात हार घालणार आहे. तिचा उखण्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होतं असून यामध्ये ती म्हणाली आहे की, “आभाळाएवढं प्रेम माझ्या नशिबात आलं, त्यांच्यासोबत असनच माझं जग झालं, इंद्राजींचं नाव घेते आता मन उडू उडू झालं.”

मन उडू उडू झालं या मालिकेच्या शीर्षकावरूनच दिपूने हा जबरदस्त उखाणा घेतला आहे. त्यामुळे याची सोशल मीडियावर मोठी चर्चा होताना दिसते. अनेक जण यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. मन उडू उडू झालं या मालिकेत दिपू आणि इंद्रा या दोघांचे लग्न व्हावे अशी गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांची इच्छा होती. ज्यावेळी हृताचे लग्न झाले तेव्हा देखील अनेक जण थोडे नाराज झाले होते. अनेकांना असं वाटत होतं की तिने इंद्राबरोबरच लग्न करावे. मात्र खऱ्या आयुष्यात तिने दुसरा जोडीदार निवडला असला तरी, प्रेक्षकांची इच्छा ती आता पूर्ण करणार आहे.

या मालिकेतील सर्व कलाकार हे त्यांच्या अभिनयाने सर्व पात्रांना उत्तम न्याय देतात. त्यामुळे खूप कमी काळात ही मालिका मोठी लोकप्रिय ठरली आहे. मालिकेत इंद्रा हे पात्र अभिनेता अजिंक्य राऊत साकारत आहे. लवकरच ही मालिका बंद होणार असून अजिंक्य आपल्याला ‘टकाटक’ या जबरदस्त विनोदी आणि चावट संवादाच्या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. तसचं हृता समोर देखील आगामी अनेक प्रोजेक्ट आहेत. मालिकेतील सर्व कलाकार त्यांच्या पर्सनल कामांमध्ये थोडे व्यस्त होणार असल्याने मन उडू उडू झालं ही मालिका बंद होत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *