Challenge! एक दोन नाही तर एकूण पाच बॉलीवूड कलाकार दडले आहेत या फोटोमध्ये, ओळखा पाहू हे कोण आहेत?

मुंबई | काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेक व्यक्ती हा फोटो नेमका कुणाचा आहे याचे चॅलेंज स्वीकारत आहेत. मात्र काहीच व्यक्तींनी हे चॅलेंज पूर्ण केलं आहे. बऱ्याच व्यक्ती यात अप्याशी झाल्या आहेत. आता तुम्हीपण या फोटोवर एक नजर टाका. या फोटोमध्ये दिसत असलेली ही छोटी छोटी गोंडस मुलं आज बॉलीवूड गाजवत आहेत.

अनेक जण यांना ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र कुणालाही एका नजरेत यांची ओळख पटलेली नाही. आता जर तुम्ही पण या चिमुकल्यांना ओळखलं नसेल तर, एक हिट देतो. ही सर्व चिल्लर पार्टी आहे कपूर कुटुंबातील. आता यावरून तुम्ही दोन मुलांना तर नक्कीच ओळखलं असेल. चला तर मग आता बाकीचे मुलं कोण आहेत हे आम्ही सांगतो.

या फोटोमध्ये तुम्ही रणबीर कपूर, सोनम कपूर, अंशुला कपूर, हर्षवर्धन कपूर आणि अर्जुन कपूर हे बॉलीवूड स्टार दडले आहेत. या फोटोमध्ये सोनम कपूर तिच्या भावाला म्हणजेच हर्षवर्धन कपूरला पकडताना दिसत आहे.

यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्याचवेळी अर्जुन कपूर त्याच्या शेजारी लाल टी-शर्ट घालून चष्मा लावून बसला आहे. सोनम कपूरच्या पाठीमागे अंशुला तिच्या मांडीत लहान मूल घेऊन दिसत आहे. तर दुसरीकडे, रणबीर कपूर आहे. हात मागे ठेवून पोज दिली आहे.

आता हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. bollywoodtriviapc नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. तसेच त्याला “कपूर्स आणि त्यांची फॅमिली” असं कॅप्शन दिलं आहे. यावर कमेंटचा नुसता पाऊस पडला आहे.

एका युजरने लिहिलं आहे की, “मी सोनम आणि रणबीरला ओळखलं.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे की, ” कपूर हे बॉलीवूडच बेस्ट कुटुंब आहे.” सोशल मीडियावर हा फोटो खूप जास्त व्हायरल होतं आहे. तुम्ही सुद्धा हा फोटो शेअर करून तुमच्या मित्रांना हे चॅलेंज देऊ शकता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *