नोरा करणार फुटबॉल वर्ल्डकपमध्ये नृत्य; हा विक्रम करणार आपल्या नावे

मुंबई | जागतिक स्तरावर फुटबॉल या खेळाला अधिक महत्त्व दिलं जातय. याच फुटबॉल स्पर्धेचा फिफा वर्ल्ड कप (fifa world cup) हा जगासाठी एक पर्वणी आहे अस म्हटल तरी वावग ठरणार नाहीये. याच फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत शकिरान ठुमके लावले होते. परंतु यावेळी जगप्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही ठुमके लावणार आहे.

भारतातील पहिलीच व्यक्ती म्हणून नोरा लावणार ठुमके? – यापूर्वी नोरा विविध भारतीय अल्बम गाणे, बॉलिवूड सिनेमे तसेच अवॉर्ड शोमध्ये ठुमके लावताना दिसली आहे. पण जागतिक स्तरावरील क्रिडा स्पर्धेत नोरा फतेही पहिल्यांदाचं ठुमके लावताना दिसणार आहे. तरी नोराच्या भारतीय फॅन्सला तिच्या या परफॉर्मन्सची मोठी उत्सुकता शिगेला पोहचलीय.

कोणत्या गाण्यावर नोरा थिरकणार:
तीन दिवसापूर्वीचं म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी हे गाणं फिफाच्या अधिकृत यूट्यब पेजवर रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणे रेडओनने प्रोड्यस केले आहे. ‘लाइट द स्काय’ असे या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात बल्कीस, मनाल, रहमा रियाद सोबत नोरा फतेही दिसून येणार आहे.

सद्या नोरा ही ‘नच बलिये’ सीजन 10 मध्ये जजेसची भूमिका करत आहे. तिचा बेली डान्स हा जगप्रसिद्ध आहे. यासाठीच ती देखील प्रसिद्ध मानली जातेय. गेल्या वर्षी पुष्पा हा सिनेमा सर्व जगभर प्रसिद्ध झाला होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. याच चित्रपटातील ऊ अंटवा वामा ऊ अंटवा… या गाण्यासाठी नोराला अपेक्षित मानधन न मिळाल्यान तिन या आयटम साँगला नकार दिला. अशी माहिती काही न्यूज मीडियानं दिल्याचं समोर आलय.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *