मराठमोळ्या अभिनेत्रीसह नोरा फतेही थिरकली; माधुरी दीक्षितनेही शिट्टया वाजवत केलं कौतुक

मनोरंजन | बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फातेही सध्या खूप चर्चेत असताना दिसत आहे. तिन आपल्या डान्समुळ चाहता वर्गही खूप मोठ्या प्रमाणात आहे. झलक दिखला जाच्या सीजन 10 ची ती सध्या जज म्हणून काम करत आहे. पण याच सिजनमध्ये ती बऱ्याचदा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तीन नृत्य केलं आहे. परंतु यावेळी तीन मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरसह वाजले की बारा या गाण्यावर डान्स केला आहे.

कलर्स वाहिनीवर पुढील होणाऱ्या शोमध्ये हा भाग दाखवला जाणार आहे. या भागात नोरान हिरवी साडी, सोनेरी नथ,ज्वेलरी घातली होती. याआधी तीन कधीच कोणत्याच लावणीवर डान्स केला नव्हता तो तीन केला आहे. अमृताचा परफॉर्मन्स संपल्यावर, माधुरीने नोरा फतेहीला स्टेजवर अमृतासह लावणी नृत्य करण्याची विनंती केली. नेहमीप्रमाणे यावेळेसही नोरा लावणी करुन सर्वांची मने जिंकून घेत आहे. ‘वाजले की बारा..’ या गाण्यावर नोराने लावणी सादर केली आहे.

माधुरी दीक्षितन वाजवल्या शिट्टया:
नोराच्या डान्समुळ तेथील सहभागी कलाकार प्रेक्षक सर्वच या डान्सचा आनंद लुटत होते. त्याचा धकधक गर्ल माधुरीन शिट्टया वाजवत या डान्सचा खूप आनंद लुटला आणि नोराच कौतुक केलं. स्टँडिंग ओवेशन देखील दिल. यावेळी माधुरी दीक्षित आणि नोरासह दिग्दर्शक करण जोहर हे देखील जज म्हणून आपली भूमिका बजावत होते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *