९ कोटींची नोकरी नाकारत वयाच्या २२ व्या वर्षी या मुलीने घेतला संन्यास…

मुबई | प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात उच्च शिक्षण घेऊन नोकरी करायची असते. मग यामध्ये काही व्यक्ती व्यवसाय करून देखील बक्कळ पैसे कमवतात. म्हणजे काय तर बहुतांश लोकांचे जीवनजक्र हे बक्कळ पैसे कमवणे आणि सुखी आयुष्य जगणे असे असते. अशात आपल्या भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. प्रेकाला आपला धर्म हा प्रिय असतो. अशात जर तुमच्यासमोर धर्माचा प्रचार आणि ९ लाखांची नोकरी या पैकी एक गोष्ट निवडण्याचा पर्याय ठेवला तर. निश्चितच अनेक व्यक्ती नोकरी निवडतील.

पुण्यामध्ये विचार करायला भाग पाडणारी एक घटना घडली आहे. एका तरुण युवतीने आपलं संपूर्ण आयुष्य धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेचण्याच ठरवलं आहे. ते ही तब्बल ९ लाख नाही तर ९ कोटींच्या पॅकेजला दूर करून. या युवतीचे नाव कल्याणी बोरा असे आहे. तिने पुण्यातून बीबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात तिला व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी वर्षाला तब्बल नऊ कोटींचे पॅकेज मिळाले होते. यावेळी ती साल २९१३ मध्ये जैन धर्माच्या एका कार्यक्रमाला हजर राहिली होती.

या कार्यक्रमाचा तिच्यावर खुप परिणाम झाला. त्यामुळे तेव्हा पासूनच तिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. अशात तिला यासाठी घरच्यांची परवानगी देखील पाहिजे होती. मात्र कुटुंबीय तुला यासाठी हिकर देत नव्हते. मात्र तिने जिद्दीने यासाठी होकार मिळवला. २०१९ रोजी तिने साण्यास घेतला आहे. तिला एक भाऊ आणि बहीण देखील आहे. संन्यास घेतला तेव्हा तिचे जय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या कमी वयात तिने हा निर्णय घेतला आहे. संन्यास घेतल्यानंतर आता तिचे नाव संयमश्रीजी महाराज असे आहे. एवढ्या कमी वयातच पैसा, प्रेम या सगळ्यांपासून ती दूर गेली आहे. जीवनात पैसा कमवणेच सर्व काही नसते असं तिचं म्हणणं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *