झी मराठी वर सुरू होत आहेत नवीन ४ मालिका; वाचा नावे आणि माहिती

मुंबई | झी मराठी या वाहिनीवर अनेक नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या प्रत्येक कार्यक्रमाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. झी मराठी या वहिनीचा एक वेगळा आणि मोठा प्रेक्षक वर्ग आहे. अशात आता याच रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झी मराठी एक दोन नाही तर तब्बल चार नवीन कार्यक्रम घेऊन येत आहे. या बातमीतून याच कार्यक्रमांची माहिती घेऊ.

बस बाई बस
झी मराठीवर बस बाई बस हा कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे. यामध्ये सुबोध भावे आपल्याला हा कार्यक्रम होस्ट करताना दिसणार आहे. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील सर्व महिला येताना दिसतील सदर कार्यक्रम हा २९ जुलै पासून सुरू होणार आहे.

डान्स महाराष्ट्र डान्स
महाराष्ट्राच्या संस्कृतीत नृत्य कलेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळेच झी मराठी त्यांच्या प्रेक्षकांसाठी डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम घेऊन येत आहे. यामध्ये अगदी छोट्या छोट्या मुलांचे भन्नाट डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर २७ जुलै पासून सुरू होत आहे.

• नवा गडी नवं राज्य
झी मराठी वाहिनीवर ही एक नवीन मलिका सुरू होणार आहे. यामध्ये साईशा भोईर ही बाल कलाकार अभिनय करताना दिसणार आहे. तसेच या मालिकेत अनिता दाते, कश्यप परुळेकर, पल्लवी पाटील, वर्षा दांदळे हे कलाकार अभिनय करताना दिसतील. ही मालिका ८ ऑगस्ट पासून प्रदर्शित होणार आहे.

तू चाल पुढ
तू चाल पुढं ही एक कौटुंबिक मालिका आहे. यामध्ये दिपा परभ ही अभिनेत्री प्रमुख पात्र साकारणार आहे. एक गृहिणी आपलं कुटुंब कसं सांभाळते. ती पैसे कमवत नसली तरी ती किती पैशांची बचत करते या सर्व गोष्टी या मध्ये पाहायला मिळणार आहेत. सदर मालिका १५ ऑगस्ट पासून झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तर आता झी मराठी वरील या आगामी कार्यक्रमांपैकी तुम्ही कोणती मलिका पाहण्यासाठी उत्सुक आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *