नीना कुलकर्णी यांची मुलं दिसतात खूप सुंदर; करतात ही काम

मुंबई | मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर दिग्गज अभिनेत्री निना कुलकर्णी यांनी प्रसिध्दीच्या उंच शिखराला गवसणी घातली आहे. आजही त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. सध्या त्या हिंदी तसेच मराठी मालिका विश्वात आई आणि सासूची भूमिका साकारताना दिसतात. सवत माझी लाडकी या मालिकेतून त्यांना अधिक प्रसिध्दी मिळाली.

त्यांनी अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्या विवाह केला होता. आज दिलीप या जगात नाहीत. मात्र त्यांची दोन्ही मुलं त्यांचा सांभाळ करत आहेत. नीना यांना सोहा आणि दिव्य अशी मुलं आहेत. आज या बातमीमधून त्यांच्या मुलांविषयी अधिक माहिती घेऊ.

नीना यांची मुलगी सोहा ही देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. ती सोनी मराठी चॅनलची जिओ व्हॉईस प्रेसिडेंट आहे. यासह तिने क्रियेटीव्ह डायरेक्टर म्हणून देखील काम केले आहे. आपल्या आई प्रमाणेच ती देखील मराठी मनोरंजन विश्वात नाव कमवत आहे. तिचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.

तसेच नीना यांचा मुलगा हा अभिनय क्षेत्रात सक्रिय नाही. त्याला क्रिकेट खूप आवडते. त्यामुळे त्याने यातच करीअर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याला फोटोग्राफीची देखील प्रचंड आवड आहे. तो या क्षेत्रात देखील काम करत आहे. विशेष म्हणजे त्याला वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला देखील खूप आवडते. तो नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत तेथील फोटो शेअर करत असतो.

नीना यांची दोन्ही मुल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्याची मुलगी दिसायला खूपच सुंदर आहे. ती नेहमीच आपले स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच आपली आई आणि भावा बरोबरचे देखील अनेक फोटो शेअर करते. नीना यांच्या मुलाला फोटोग्राफीचे वेड असल्याने तो नेहमी त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलेले फोटो शेअर करत असतो.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *