नर्गिस यांची नात दिसते खुपचं सुंदर; अमेरिकेत जाऊन करतेय हे काम

मुंबई | बॉलिवूडच्या नावाजलेल्या घरणायांमध्ये दत्त घराणे देखील शामील आहे. नर्गिस दत्त या त्यांच्या काळातील बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होत्या. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट या सिनेसृष्टीला दिले आहेत. नर्गिस यांनी अभिनेते सुनील दत्तसोबत लग्न केले. ‘तलाश-ए-हक’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली.

त्यांचा जन्म पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे झाला. मदर इंडिया हा त्यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट होता. यामध्ये त्यांनी साकारलेली आई आजही चर्चेत असते. या चित्रपटासाठी त्यांना साल 1957 मध्ये अकादमी पुरस्काराचे नामांकन मिळाले होते आणि या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

त्याचबरोबर ‘रात और दिन’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नर्गिस आता या जगात नाहीत मात्र त्यांच्या अभिनयाने त्या अजरामर झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांची मुलं आणि नातवंड नेहमी चर्चेत असतात. त्यामुळे नर्गिस यांची देखील चाहत्यांना खूप आठवण येते.

संजय दत्तची मुलगी आणि नर्गिस यांची नात त्रिशाला नेहमीच चर्चेत असते. त्रिशला दत्त मोठी झाली आहे. तिच्या इंस्टाग्राम पेजवर मानसिक आरोग्य, जीवनशैली आणि फॅशनशी संबंधित पोस्ट नेहमीच पाहायला मिळतात. त्रिशाला दत्त ही संजय दत्त आणि ऋचा शर्मा यांची मुलगी असून ती अमेरिकेत राहते.

तिने आता पर्यंत वडील संजय दत्तसोबतचे अनेक फोटोही आहेत. साल 2019 मध्ये तिने तिचा प्रियकर गमावला. इंस्टाग्रामवर लाइव्ह चॅटमध्ये तिने शेअर केले की तिने प्रियकराच्या मृत्यूच्या धक्क्याला सामोरे जाण्यासाठी डॉक्टरांची मदत घेतली होती. यामुळे ती खूप खचली होती. त्रिशाला नेहमीच बॉलीवूडच्या झगमगपासून दूर राहिली आहे.

त्रिशला दत्त इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. तसेच दररोज तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. फोटोत तिची ग्लॅमरस स्टाईल अनेकांना भावते. त्रिशालाने तिचा प्रियकर गमावला होता, त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. मात्र ता ती यातून हळूहळू बाहेर येत आहे.

तिने एका लाइव्ह चॅटमध्ये सांगितले होते की, ” मी हळूहळू ही परिस्थिती स्वीकारान्याकडे वाटचाल करत आहे आणि त्यातून सावरत आहे. मला त्याच्याशिवाय जगण्याची इच्छा नाही. मात्र मी आता खरी परिस्थिती स्वीकारली आहे. ” त्रिशालाने खूप कमी वयात आईला गमावले आहे. अशात तिच्या प्रियकराचे निधन झाल्याने ती आणखीनच दुःखी झाली. ती सोशल मीडियावर सक्रिय असली तरी तिचे अकाऊंट प्रायव्हेट आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *