निःशब्द! २५ बहिनींसाठी रक्षाबंधन ठरलं अखेरचं; ५० लोक असलेली नाव पाण्यात पलटली

लखनौ | रक्षाबंधन या पवित्र दिवशीच भावाला भेटायला जाणाऱ्या २० ते २५ बहिणींना जलसमाधी मिळाली आहे. या घटनेनं सगळीकडे मोठा शोक पसरला आहे. यमुनेच्या पात्रात एक नाव बुडाली आहे. त्यात या महिला आपल्या मुलांना घेऊन बसल्या होत्या. या सर्व जणी आपल्या माहेरी चालल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे.

तसेच ही नाव बांद्याहून फतेहपूरच्या दिशेने निघाली होती. या घटनेने स्थानिक नागरिक देखील हवालदिल झाले असून अनेकजण बचाव कार्यात पुढे आले आहेत. पाणबुड्या घेऊन या महिलांचा शोध सुरू आहे. सदर घटना आता पर्यंत ४ व्यक्तींचे मृत देह सापडले आहेत मात्र अजूनही २५ पेक्षा जास्त व्यक्ती बेपत्ता आहेत. शोध पथक यांचा शोध घेत आहे.

• असा झाला अपघात
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ५० जण फतेहपूरला जाणाऱ्या नावेत बसले होते. काही व्यक्ती समगरा गावातून मरका घाटावर येऊन थांबले होते. नंतर ते या बोटीत बसले. असोथर घाटावर जाण्यासाठी अनेक प्रवाशी यात बसले होते. नाव जेव्हा यमुना नदीच्या मध्यभागी आली तेव्हा ती असंतुलित झाली. त्यामुळे सगळे जण नदी पात्रात बुडाले.

• मूर्ख पणाची हद्द पार
या नावेत प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती बसल्या होत्या. एका प्रत्यक्षदर्शिने सांगितले की, ” मी आमच्या गावाहून पत्नीला तिच्या माहेरी घेऊन चाललो होतो. मोटासायकल घेऊन मी तिथे पोहचलो मात्र तिथे एकच नाव होती. त्यामुळे मी थांबून राहिलो. मात्र ३ च्या नंतर गर्दी वाढू लागली. आम्ही देखील नावेत बसलो. नदीच्या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी जलमार्गच होता. त्यामुळे यात ५० व्यक्ती बसल्या. काही व्यक्ती आपल्या मोटासायकलसह यात बसल्या होत्या.”

पुढे त्या व्यक्तीने सांगितले की, नाव जेव्हा नदीच्या मध्य भागी आली तेव्हा ती हलू लागली. त्यामुळे सगळे घाबरले. अनेकजण एकडे तिकडे जाऊ लागले. यामुळे एका बाजूला जास्त भार आला. यात नाव उलटी झाली. यावेळी त्यांना पोहता येत होतं ते वाचू शकले मात्र बायका आणि लहान मुलंना पोहता येत नसल्याने त्यांचे जीव गेले. यावेळी बाजूने जाणाऱ्या बाकीच्या काही नावांनी बुडत असलेल्या व्यक्तींना वाचवण्याचे काम सुरू केले. मी देखील एका नावेचा आधार घेतला. मात्र माझी पत्नी आणि मुलं वाचू शकली नाही.

पी के यादव या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ” मी देखील माझी मोटासायकल घेऊन नावेत चढलो होती. मी वाचलो पण मोटासायकल गेली. यात ४० ते ५० जण होते. त्यातील १५ जण सुखरूप आहेत. मात्र २५ ते ३० जण अजून बेपत्ता आहेत. मी लखानौ मधून समधराला आलो होतो. इथे मी माझ्या पत्नीला तिच्या माहेरी सोडले आणि मी पुन्हा माझ्या बहिणीकडे बरैचीला निघालो होतो. ”

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *