मुरांबा मालिका अडचणीत; मालिका बंद करण्यासाठी प्रेक्षकांचा आक्रोश

मुंबई | स्टार प्रवाह या वाहिनीवर आता पर्यंत अनेक मालिका चालल्या आहेत. मालिका रंजक व्हायाव्यात यासाठी मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतो. मात्र बऱ्याचदा हा ट्विस्ट चाहत्यांच्या चांगलच डोक्यात जातो. त्यामुळे अनेक जण मालिका बंद करा असा हल्ला बोल करतात. आता मुरांबा या मालिकेबाबत देखील असाच काहीसा प्रकार घडतो आहे.

मुरांबा या मालिकेत अक्षय आणि रमा हे पात्र आणि त्यांच्यातली केमेस्ट्री सर्वांना आवडते. अशात अक्षय हा सुरुवातीपासून थोडा रागीट आणि उद्धट स्वभावाचा दाखवला आहे. मात्र रमा ही अतिशय गुणी मुलगी दाखवली आहे. मालिकेत खूप सारी संकट आल्यानंतर आता कुठे सर्व काही नीट सुरू आहे.

अशात अक्षयचा स्वभाव देखील बदलत चालला आहे. तो हळूहळू रमा वर प्रेम करू लागला आहे. मात्र आता मध्येच मालिकेत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत रमा आणि अक्षय यांच्यामध्ये प्रेमाचे वारे वाहत आहेत हे पाहून सर्व जन खुश होते. मात्र आता पुन्हा एक संकट आलं आहे. यामुळे मालिका परत वेगळ्या वळणावर गेली आहे.

मालिकेत रेवाची एन्ट्री झाली आहे. तिच्या मुळे पुन्हा एकदा रमा आणि अक्षय या दोघांमध्ये दुरावा निर्माण होताना दिसतो आहे. यामुळे प्रेक्षक या मालिकेवर खूप संतापले आहेत. अनेक जण वेगवेगळ्या टीका करत आहेत. अनेकांनी ही मालिका बंद करा असे देखील म्हटले आहे. तसेच रेवाला मालिकेतून हाकलून द्या असा पवित्रा प्रेक्षकांनी घेतला आहे. मालिका खूप भरकटत आहे. मालिका नीट चालवा असे देखील अनेक जण म्हणत आहेत.

अशात या मालिकेत अक्षय हे पात्र अभिनेता शशांक केतकर साकारतो आहे. मालिकेतील त्याचा अभिनय खरोखर कौतुकास्पद आहे. या आधी होणार सून मी या घरची या मालिकेत तो दिसला होता. या मालिकेमुळे त्याला कमालीची प्रसिध्दी मिळाली होती.

मालिकेत रमाच्या भूमिकेमध्ये शिवानी मुंडे ही दिसत आहे, तर निशाणी बोरुडे ही रेवा राजाध्यक्ष हे पात्र साकारताना दिसत आहे. प्रतिमा कुलकर्णी, आशुतोष वाडेकर, प्रतीक निकम, श्वेता कामात, राजश्री परुळेकर, सुलेखा तलवलकर, शाश्वती पिंपळीकर, विश्वास नवरे, आशिष जोशी, अभिजीत चव्हाण, स्मिता शेवाळे हे सर्व कलाकार या मालिकेत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *