अभिनेते रवी किशन यांच्या मुलीने अग्निपथ योजनेला दिला पाठिंबा, चार वर्षांसाठी तिला करायची आहे देशसेवा

दिल्ली | मोदी सरकारने आता पर्यंत अनेक वेगवेगळ्या आणि नवनवीन योजना आणल्या आहेत. ज्याचा लाभ काही व्यक्तींनी घेतला आहे. तर आजही अनेक व्यक्ती त्यांच्या योजनेपासून वंचित आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अग्निपथ’ या योजनेची घोषणा केली. या योजनेला अनेकांनी सहमती दर्शवली तर बऱ्याच नागरिकांनी याला विरोध केला.

अनेक राज्यांमध्ये या योजनेच्या विरोधात निदर्शने केली गेली. मात्र आता भाजपचे खासदार रवी किशन हे ‘अग्निपथ’ योजनेला पाठिंबा देताना दिसले आहेत. रवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांच्या मुलीला ‘अग्निपथ’ या योजनेचा लाभ घेण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. सदर योजनेला विरोध करणाऱ्या व्यक्तींबरोबरच सहमती दर्शवणाऱ्या व्यक्ती देखील बऱ्याच आहेत. त्यातीलच एक रवी किशन यांची कन्या इशिता.

खासदार रवी किशन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर आपल्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या मुलीने एनएसएसचा युनिफॉर्म परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत खासदार रवी किशन यांनी लिहिले आहे की, ” माझी मुलगी इशिताला ‘अग्निपथ ‘ या योजनेमार्फत भारतीय सेनेत भरती व्हायचे आहे. तिला देश सेवा करण्याची खूप इच्छा आहे.”

आपल्या ट्विटमध्ये रवी यांनी पुढे लिहिले आहे की, ” आज सकाळी माझी मुलगी इशिता मला म्हणाली की, बाबा मला अग्निपथ योजनेमार्फत भारतीय सैन्यात सामील व्हायचे आहे. यावर मी तिला म्हणालो की, हो नक्कीच बेटा.” खासदार रविशंकर यांनी पोस्ट केलेल्या ट्विट वरती त्यांना अनेक वेगवेगळ्या कमेंट आल्या आहेत.

इशिताने व्यक्त केलेली ही इच्छा पाहून अनेक जण तिचे कौतुक करत आहेत. तसेच तिच्या हिमतीची दात देखील देत आहेत. मात्र यावरती अनेकांनी खोचक टीका देखील केली आहे. एका युजरने यावर कमेंट करत लिहिले आहे की, ” त्या गरीब सैनिकांचा विचार करा जे वर्षानुवर्षे सैन्यात भरती व्हावी म्हणून मेहनत घेत असतात. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना फक्त चार वर्षेच मिळावे का?”

तर आणखीन एकाने लिहिले आहे की, ” तुमची मुलगी चार वर्षांनंतर तुमचा व्यवसाय सांभाळे. मात्र गरीब कुटुंबातून सैन्यात भरती झालेले मुलं चार वर्षानंतर काय करतील? ” खासदार रवी किशन यांच्या या ट्विट वरती बऱ्याच व्यक्तींनी संताप व्यक्त केला आहे.

*काय आहे अग्निपथ योजना थोडक्यात जाणून घेऊ*

आतापर्यंत सैन्य भरतीमध्ये अनेक युवक मोठ्या मेहनतीने भरती होत होते. अशात आता त्यांच्या सेवेचा कार्यकाळ कमी केला आहे. सैन्यामध्ये त्यांना फक्त चार वर्षे नोकरी करता येणार आहे. चार वर्षांनंतर इतर व्यक्तींना संधी दिली जाणार आहे. तसेच भरती झालेले सैनिक सेवानिवृत्त होणार आहेत.

प्रत्येक व्यक्ती शासकीय नोकरी मिळावी म्हणून धडपड करत असतो. अशात गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी खूप मेहनतीने अभ्यास करतात शारीरिक श्रम घेतात आणि सैन्यात भरती होतात. त्यामुळे फक्त चार वर्षे सेवेत राहावे लागणार असल्याने अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *