मौसमी चटर्जी यांची एक मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री तर दुसरीचा झाला हृदय द्रावक मृत्यू

मुंबई | सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे नेहमीच कोणी ना कोणी चर्चेत असतं. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री मोसमी चटर्जी यांना तर तुम्ही ओळखतच असाल. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार अभिनय केला आहे. असे असले तरी त्या माध्यमांमध्ये फारशा दिसत नाहीत.

मात्र त्यांची मुलगी मेघा चटर्जी ही सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. मेघा ही देखील आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलीवूडमध्ये नाव कमवत आहे. आता पर्यंत ती काही मोजक्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहेत. तिच्या या फोटोंना अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

मेघा नेहमीच आपले सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तसेच तिचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले तर समजते की, तिला बाहेर फिरायला खूप आवडते. ती नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असते. त्या ठिकाणची माणसे, तिथल्या संस्कृती या सर्व गोष्टींबाबत तिला खूप आकर्षण आहे.

ती दिसायला देखील खूप सुंदर आहे. या अभिनेत्रीने आता पर्यंत ‘रसलान’ आणि ‘ऐसा क्यू होता है’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिच्या या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप पसंती दाखवली. तसेच यातील ‘ऐसा क्यू होता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट यांनी केले होते.

मेघा चटर्जीबरोबरच मौसमी यांना आणखीन एक मुलगी होती. त्यांच्या दुसऱ्या मुलीचे नाव पायल चटर्जी असं होतं. मात्र त्यांच्या दुसऱ्या मुलीला खूपच कमी आयुष्य मिळालं. वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी तिचं निधन झालं. मधुमेह या आजाराने ती लवकरच त्रस्त झाली होती. आजाराधिक वाढल्याने तिने या जगाचा निरोप घेतला. पायल विवाहित देखील होती. मात्र तिचा त्रास वाढू लागल्याने साल 2018 मध्ये ती कोमामध्ये गेली होती. यावेळी आपल्या मुलीची देखभाल आपण स्वतः करावी असं मोसमी यांचं म्हणणं होतं. मात्र यासाठी त्यांना न्यायालयाचे दार देखील ठोठावे लागले.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *