कुस्ती क्षेत्रात शोककळा! प्रसिध्द 23 वर्षीय पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पंढरपूर | हल्ली हृदय विकाराच्या घटना अधिकच वाढत आहेत. पंढरपूर मधील वाखरी येथे राहणाऱ्या एका तरुण पैलवानाला हृदय विकाराचा झटका आला आहे. त्याच नाव मारुती सूरवसे असून वय 23 वर्षे होते. कोल्हापूरातील तालमीत काल (ता. 3 ऑक्टोंबर) रोजी ही घटना घडली. दरम्यान मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बऱ्याच दिवसापासून मारुती हा वाखरी येथे तालमीत आहे. कुस्तीचा सराव करून आल्यावर तो अंघोळीला गेला. त्यानंतर अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याचे वडील हे वाखरी येथे शेती करतात. मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी त्याला कोल्हापूर येथील तालमीत सरावासाठी पाठवण्यात आलं होतं.

मुंबई येथे गरबा खेळताना मुलाला आला हृदय विकाराचा झटका – शनिवारी (1ऑक्टोंबर) रोजी मुंबई येथील मुलुंडमध्ये गरबा खेळताना ऋषभ लहरी मंगे भानुशाली यांना गरबा खेळताना हृदय विकाराचा झटका आला. त्याच वय 25 असून घरातला एकुलता एक कमावता होता. त्याच्या कुटुंबातील करता धरता तो स्वतः असल्यानं बोरिवली येथे कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्या मागे त्याचे आई आणि वडील हे दोघेच आहेत.

हृदविकारात होतेय वाढ – सध्या बऱ्याचशा तरुणांमध्ये हृदय विकाराचा त्रास होताना दिसतो. तो लवकर कळूनही येत नाही. यामुळे बऱ्याचशा प्रमाणात तरुणांना हृदयविकार झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत आहेत. गेल्या वर्षी अनेक प्रसिद्ध कलाकार आणि व्यक्तींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 2020 साली 25 हजारांहून अधिक लोकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *