सिनेसृष्टीत शोककळा! प्रसिध्द अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहे. रमेश देव, लता मंगेशकर यांनी देखील जगाचा निरोप घेतला आहे. यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे.

 

हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मंजू सिंग यांनी वयाच्या 74 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मंजू सिंग यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीला मोठी पोकळी पडल्याचे सांगितले जातं आहे.

 

त्यांनी गोलमाल या चित्रपटांत रत्नाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्या अत्यंत प्रकाश झोतात आल्या होत्या, त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही कार्यक्रमासाठी निवेदिता म्हणून काम देखील पाहिलं आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत अस्वस्थ होती. आज अचानक त्यांची तब्येत फारच बिघडली, आणि यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांना ताई म्हणून ओळखले जायचे.
हिंदी सिनेसृष्टीतील त्या एक जेष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या, त्या गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये वास्तव्यास होत्या, मंजू यांचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे. त्यांच्या निधनाची बातमी सगळीकडे पसरल्यावर चाहत्यांना अश्रू अनावर झाले.

 

मंजू सिंग यांना अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. सिंग आणि बॉलिवूड मधील अनेक दिग्गजांचे जवळच नात होत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *