सिनेसृष्टीत शोककळा! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; बाथरूम मध्येच घेतला अखेरचा श्वास

दिल्ली | दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून आणखीन एक दुःखद घटना समोर आली आहे. मल्याळम सिनेसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्याचा शौचालयात मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मल्याळम आणि तमिळ चित्रपट सृष्टीतील अभिनेते खालिद यांनी शुक्रवार २४ जून रोजी या जगाला अलविदा केलं आहे. चित्रपट आणि अभिय या गोष्टींशी त्यांची नाळ मजबूत जोडली गेली होती. त्यामुळे त्यांनी सेटवरच अखेरचा श्वास घेतला.

दाक्षिणात्य सिनेसृष्टी आता हळहळ व्यक्त करत आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते तरी देखील सिनेसृष्टीत सक्रिय होते. त्यांच्या एका आगामी चित्रपटाच्या शुटींगला ते गेले असता, सेटवर थोड्यावेळासाठी ते शौचालयात गेले होते. त्याचवेळी मृत्यूने त्यांना कवटाळले. बाथरूममध्येच त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि ते खाली पडले.

सदर घटना सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. ते सेटवर दिसत नव्हते त्यामुळे काही वेळानी सेटवरील काही व्यक्ती त्यांना शोधू लागले. बाथरूममध्ये गेले असता त्यांना खालिद खाली पडलेले दिसले. त्या व्यक्तींनी तात्काळ खालिद यांना रुग्णालयात हलवले. मात्र पोहचे पर्यंत त्यांच्या मृत्यू झाला.

ही सर्व खबर कळताच पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ही माहिती दिली आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जिस्मिर उर्फ शिजू खालिद रहमान खालिद यांचा मुलगा आहे.

खालीद त्यांच व्यक्तिमत्त्व खूप वेगळं होतं. ते खूप मोठ्या मनाचे होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मामूट्टी, रजनीकांत आणि चिरंजीवी यांच्यासारख्या अनेक मोठ्या कलाकारांबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील पुनीत राजकुमार या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

खालिद यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मोठा तसेच छोटा पडता देखील खूप गाजवला आहे. अनेक मालिकांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा अभिनय खरोखरच खूप दांडगा होता. सोशल मीडियावर अनेक चाहते आणि सिनेसृष्टीतील कलाकार त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.

त्याचबरोबर अनेक प्रसिद्ध गायकांनी देखील या महिन्यात या जगाचा निरोप घेतलेला आहे. सिनेसृष्टीमध्ये सतत घातपात, आत्महत्या आणि मृत्यूच्या बातम्या समोर येत आहेत. अशात खालिद यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *