मराठी कलाविश्वात शोककळा! प्रसिध्द कलाकाराचे निधन; वयाच्या 50व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मुंबई:मराठी कला विश्वातील दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. अनेक दिग्गजांच्या निधनाने कला विश्वात मोठी पोकळी निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर जगाचा निरोप घेत आहेत. मात्र त्यांच्या सोबत मराठी सांस्कृतिक कलाकार देखील जगाचा निरोप घेत आहेत.

 

 

प्रसिध्द सांस्कृतिक कलाकार डॉ. रामचंद्रजी देखणे यांनी जगाचा निरोप घेतला आहे. कलेला महत्त्व देऊन, संस्कृतीत विभागात कलेचे महत्व जगाला पटवून देऊन, कला संशोधक ही पदवी मिळविलेला दिग्गज कलाकार या जगाला सोडून गेला आहे. त्यांनी तमाशा, पोवाडा, भारुड, लावणी अशा बऱ्याच कला वेगळ्या स्वरूपात जगाच्या समोर आणल्या होत्या.

 

रामचंद्र यांना लहान पणापासून या कलांची फार आवड होती. सुरुवातीला शाळेत असताना त्यांनी नाटकात काम केले. तसेच त्यांनी डान्स स्पर्धेत भाग घेऊन देखील नाव कमविले. हळूहळू त्यांची कला ही पडद्यावर रंगु लागली आणि अवघ्या काही दिवसात त्यांनी कला क्षेत्रात उतुंग भरारी घेत नावलौकिक मिळविले.

 

त्यांच्या निधनाने मराठी कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सांस्कृतिक कलांमध्ये फार कमी कलाकार मराठी कला विश्वात राहिले आहेत. त्यात रामचंद्र हे जेष्ठ कलाकार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक कलाकारांना विद्या शिकवून कलाकार बनविले आहे.

 

त्यांच्या निधनाने सांस्कृतिक कला विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे निधन हे न पचण्या सारखे आहे. अनेक दिग्गज मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कलेमुळे ते एक लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जायचे. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *