आईच्या चहाची तलफ बाळासाठी ठरली धोकादायक; पूर्ण प्रकार वाचून काटा येईल

मुंबई | चहाची तलफ आली तर कधी एकदा वाफाळता चहा पितो असं न वाटणारा चहाप्रेमी विरळच असेल. चहा पिण्याचे तोटे कितीही सांगितले जात असले तरी चहाप्रेमी त्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यात बाहेर मस्त पाऊस पडत असेल तर चहा हवाच असं म्हणणारी मंडळीही काही कमी नाहीत.

घरकाम करून आलेला कंटाळा घालवण्यासाठी गृहिणींना तर चहातूनच नवा उत्साह मिळत असतो. पण अशी चहाची तलफ एका आईसाठी तिच्या बाळाच्या जीवावर कशी बेतू शकते हे एका भयंकर दुर्घटनेतून समोर आलं. आईच्या चहानेच चिमुकल्या बाळाची अवस्था गंभीर होताच आता तिने कधीही चहाला हात न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ही घटना घडली आहे इंग्लंडमध्ये.  पण हा प्रकार सोशलमीडियावर व्हायरल होताच साऱ्या जगातील नेटकरी त्या चिमुकल्याची अवस्था पाहून हळहळत आहेत. इंग्लंडच्या केंटमध्ये राहणारी करिए डॉयले ही महिला तिचा एक वर्षाचा मुलगा मैसोनला घेऊन प्ले ग्रुपला जात होती.

रस्त्यात रेस्टॉरंट बघून तिला चहाची तलफ भागवण्याचा मोह झाला. हॉटेलमध्ये जाऊन तिने चहाची ऑर्डर दिली. त्यावेळी मैसोन तिच्याजवळच होता. पण कपातील गरम चहा मैसोनच्या अंगावर पडला. वाफाळत्या चहाने मैसोनचं शरीर भाजलं आणि तो जोरजोरात रडू लागला.

याबाबत करिएने सांगितलेल्या माहितीनुसार, मैसोनसोबत ती रेस्टॉरंटमध्ये बसले होते. वेटर चहा घेऊन आला तेव्हा तिच्या हातात बाळाची ट्रॉली होती. त्यामुळे वेटरने चहा आणून टेबलावर ठेवला आणि चहा ठेवल्याचं सांगून तो निघून गेला. कऱिएने वेटरचा आवाज ऐकला मात्र तिच्या लक्षात आले नाही. इतक्यात तिला मैसौनच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला, तिने पाहिले तर मैसोनच्या पायावर चहा सांडल्याने पाय भाजला होता.

ही घटना पाहताच करिए खूप घाबरली. तिने लगेच मुलाच्या पायावर थंड पाणी ओतलं आणि लगेच मैसोनला घेऊन हॉस्पिटल गाठलं. मैसोनची जखम इतकी खोलवर गेली होती की चार तास त्याच्यावर उपचार करून छोटी सर्जरी करावी लागली. या भयंकर घटनेतून मैसौन आता सावरला असला तरी यापुढे कधीच चहा पिणार नाही असा निर्णय करिए हिने घेतला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *