आई बाबा मला माफ करा, चिठ्ठी लिहून प्रेम विवाह केलेल्या डॉक्टर महिलेची आत्महत्या

मुंबई | तीन महिन्यांपूर्वी एका प्रेमी युगलकाने आंतरजातीय विवाह केला. यामध्ये मुलगी ही एक डॉक्टर होती. लग्नाला थोडे दिवस झाल्यानंतर लगेचच पतीकडून आणि सासरच्या व्यक्तींकडून अमानुष त्रास होत असल्यामुळे या डॉक्टर मुलीने स्वतःचे जीवन संपवले आहे. इन्सुलिनचे इंजेक्शन तिने आपल्या रक्तवाहिनीमध्ये घेतले. यामुळे ती जागीच बेशुद्ध पडली. तिच्यावर उपचार सुरू होते मात्र उच्चार दरम्यान या मुलीचा मृत्यू झाला आहे.

या घटनेमध्ये सातारा येथील पोलीस ठाण्यात पती,दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पत्नी वर्षा अंबादास व्यवहारे वय २५ , ( डॉक्टर) , पती धनंजय वसंत डोंगरे, . वर्षा आणि धनंजय या दोघांनी आंतरजातीय विवाह केला. घरच्यांची संमती नसल्यामुळे 2 मे 2022 रोजी या दोघांनी रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात लग्न केले. लग्न झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी या लग्नाला संमती दिली. मात्र मुलाचे कुटुंबीय या लग्नाला मान्यता देत नव्हते. लग्न झाल्यानंतर लगेचच मुलाच्या कुटुंबातील सासरे वसंत डोंगरे, सासुबाई सिंधुबाई आणि दिर बप्पा या तिघांनी मिळून वर्षाला त्रास द्यायला सुरुवात केली.

ते सतत तिची अवहेलना करत होते. तसेच तिला अपमानास्पद वागणूक देत होते. त्यानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तू आमच्या जातीतली नाहीस त्यामुळे तू इथून निघून जा आम्ही तुला आमच्या मुलाला सोडण्यासाठी एक लाख रुपये देतो. आम्हाला आमच्या मुलाचे दुसरे लग्न करायचे आहे त्यामुळे तू त्याला सोडून जा. असे तिच्या सासरचे मंडळी तिला सांगत होते.

यामुळे वर्षा खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. तसेच तिच्या पतीने देखील तिची साथ सोडली होती. तो देखील तिला सतत मारहाण करत होता. काही दिवसांपूर्वी ती गर्भवती राहिली होती. ती दुसऱ्या जातीचे असल्यामुळे तिची सासू तिला खूप मारहाण करत होती. त्यामुळे तिने महिला तक्रार निवारण केंद्रात 30 जुलै रोजी सासू विरोधात तक्रार नोंदवली. तसेच धनंजय विरोधात तिने क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

तीन ऑगस्टच्या रात्री वर्षा आणि धनंजय यांचे पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. यावेळी धनंजयने वर्षाला परत एकदा शिवीगाळ आणि मारहाण केली. यावेळी ती आपल्या खोलीमध्ये पळून गेली आणि दरवाजा लावून घेतला. या सर्व जाताला ती पूर्णतः कंटाळली होती. त्यामुळे तिने जीव देण्याचा निर्णय घेतला. तिने इन्सुलिनचे इंजेक्शन स्वतःच्या रक्तवाहिनीमध्ये भरले.

तिने सुमारे दोन हजार मीटर इन्सुलिन स्वतःच्या शरीरात घेतले होते. त्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. यावेळी तिच्या पतीने बाहेरून दार बऱ्याच वेळा ठोठावले. तसेच तिला फोन देखील केले. मात्र ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर तिच्या पतीने तिच्या बहिणीला फोन करत सांगितले की, वर्षा माझा फोन अजिबात उचलत नाहीये. यावर तिच्या बहिणीने आणि कुटुंबीयांनी देखील तिला भरपूर फोन केले. मात्र तिचा काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिचे कुटुंबीय फार भयभीत झाले.

त्यामुळे वर्षाचे कुटुंबीय 4 ऑगस्ट रोजी बीड हुन औरंगाबादला आले. इथे आल्यावर मुलीच्या सासरी गेले असता त्यांना सर्व प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या मुलीला रुग्णालयात हलवले. रुग्णालयातील उपचार त्यांना परवडत नसल्याने त्यांनी तिला उपचारांसाठी घाटी रुग्णालयात हलवले. मात्र वर्षावर सुरू असलेले उपचार सर्व यशस्वी ठरले. मंगळवारी तिने या जगाचा निरोप घेतला.

वर्षाने आत्महत्या करण्याआधी एक पाच पानांची सुसाईड नोट लिहिली होती. ही सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. तिने या नोटमध्ये म्हटले आहे की, माझा मृत्यू झाल्यास माझा मृत्यू झाल्यास माझे सासू-सासरे दिर आणि पती हे जबाबदार असतील. या नोटमध्ये तिने सासू-सासर्‍यांनी दिलेल्या त्रासाबद्दल सविस्तर लिहिले आहे. तसेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक झाल्याचे देखील तिने यात म्हटले आहे. यावेळी तिने तिच्या फिक्स डिपॉझिट, मोबाईल फोनचे पासवर्ड, बँकेत असलेल्या अकाउंटचे पासवर्ड, अकाउंट नंबर, तसेच तिच्याकडे असलेल्या सर्व पैशांची माहिती आणि त्याचे पासवर्ड लिहून ठेवले आहेत. माझे सर्व पैसे माझ्या आई-वडिलांना मिळावे असे देखील तिने यात लिहिले आहे.

आपल्या सुसाईड नोटमध्ये वर्षाने लिहिले आहे की, ” मम्मी पप्पा मला माफ करा. त्याने मला फसवले आणि मी फसत गेले. माझं त्याच्यावर प्रेम होतं मात्र तुमच्यापेक्षा जास्त नव्हतं. मी त्याला लग्नाला देखील नकार दिला होता मात्र त्याने मला धमकी देऊन बोलावून घेतले. मला होणारा त्रास असेही झाला होता. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. याचा तुम्हाला त्रास होत असेल मात्र तुम्ही या त्रासातून बाहेर याल. पण जर मी जगले असते आणि तुमच्याकडे येऊन राहिले असते तर होणारा अपमान मला सहन झाला नसता आणि याचा तुम्हालाही खूप त्रास झाला असता.
– तुमची डॉ. वर्षा

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *