अल्पवयीन मुलाने वडिलांवर केले चा’कू’ने वा’र; कारण पाहून धक्काच बसेल

बारामती | कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे त्यामुळे तो कुणीच हातात घेऊ नये. मात्र तीन अल्पवयीन मुलींनी हाच कायदा हातात घेऊन गंभीर गुन्हा केला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या मुलांनी ५४ वर्षीय व्यक्तीवर चाकूने वार करून त्या व्यक्तीचा खात्मा केला आहे. सदर घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

शाळेच्या परिसरात ही भयानक घटना घडली. यात ५४ वर्षीय मुलीचे वडील तिला शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी आले होते. शाळा सुटायला काही मिनिटे बाकी होती. त्यामुळे शाळेतील परिसरात ते मुलीची वाट पाहत उभे होते. मुलीने जेव्हा खाली येऊन वडिलांना पाहिले तेव्हा ती खूप रडली. कारण तिचे बाबा रक्त बंबाळ होऊन जमिनीवर कोसळले होते. सदर घटना समजताच पोलिसांनी तिथे धाव घेतली.

सदर घटना बारामती शहरातील श्रीराम नगर कवी मोरोपंत हायस्कूल जवळ घडली. याच शाळेत त्यांची मुलगी शिकत आहे. घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्रिमूर्ती नगर येथे मयत ५४ वर्षीय शशिकांत कारंडे राहत होते. सायंकाळी सवा पाच ते साडे पाचच्या सुमारास ते शाळेतील परिसरात मुलीला आणण्यासाठी गेले होते.

मात्र तिथे तीन अल्पवयीन मुलांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. हे वार त्यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर केले गेले. त्यामुळे रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेत पोलीस अधिक तपास करत असून तिन्ही आरोपी मुले फरार आहेत.

पूर्ववैमन्सातून हा हल्ला करण्यात आल्याचे समजले आहे. तसेच या आधी देखील शशिकांत कारंडे यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. मात्र जेव्हा वडिलांवर हा हल्ला झाला तेव्हा त्यांना आपल्या जिवाला मुकावे लागले आहे. पोलीस या तिन्ही गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. सदर घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबीय फार दुःखात आहेत. तसेच शाळेच्या परिसरात ही घटना घडल्याने इथे भीतीदायक वातावरण पसरले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *