अखेर मिका सिंगला मिळाली त्याची जीवनसाथी, आकांक्षा पुरीने जिंकल मिकाच मन

मुंबई| स्टर भारतवरील लोकप्रिय शो ‘स्वयंवर – मिका दी वोटी’ प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक मीका कुणाला त्याची पत्नी म्हणून निवडणार याची वाट पाहत आहेत. अशात प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या शोमध्ये मिका सिंगने त्याची खूप चांगली मैत्रिण आणि अभिनेत्री आकांक्षा पुरीची जोडीदार म्हणून निवड केली आहे. या शोच्या अंतिम फेरीत आकांक्षा पुरीने प्रणितिका दास आणि नीत महल यांना हरवून मिकाच्या हृदयात तिची जागा पक्की केली आहे. त्यामुळे आता दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

शोमध्ये मिका सिंगने अनेक मुलींमधून तीन सुंदरींची निवड केली होती. असं म्हटलं जात होतं की तो या तिघांच्याही प्रेमात पडला आहे. पण नंतर मिकाच्या लक्षात आले की आकांक्षा त्याला खूप चांगल आणि जवळून ओळखते. त्यामुळे मिकाने आकांक्षा पुरीला लग्नासाठी होकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी ‘स्वयंवर मिका दी वोटी’मध्ये आकांक्षा पुरीची एंट्री झाली होती आणि तेव्हापासून तिचं मिकाची दुल्हनियाँ होणार असल्याच म्हटलं जातं होत.

अशात आता आकांक्षा आणि मिकाचे हळद आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आकांक्षाने काही वेळापूर्वी तिच्या मेहंदी आणि हळदी समारंभातील फोटो शेअर केलेत. आकांक्षाने तिच्या संगीतासाठी काळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यावेळी आकांक्षा पुरी आणि मिका सिंग गुरु रंधावा आणि इतर पाहुण्यांसोबत स्टेजवर नाचताना दिसले. हळदीसाठी आकांक्षाने हलक्या पिवळ्या रंगाचा लेहेंगा चोली आणि फुलांचे दागिने घातले होते.

अशात आता मिका सिंगने सर्व रितीरिवाजांसह लग्न करण्यापूर्वी आकांक्षासोबत काही कॉलिटी टाइम घालवण्यासाठी वेळ मागितला आहे. इतकेच नाही तर मिका सिंगने आकांक्षा पुरीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या मध्ये विशेष म्हणजे मिका सिंग आणि आकांक्षा गेल्या 13-14 वर्षांपासून मित्र आहेत आणि अभिनेत्रीने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला होता. मात्र असे अताना आता तीच मीकाची नवरी होणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *