मराठमोळा तरुण 2020 पासून करतोय अमीर खानच्या मुलीला डेट; सोशल मीडियावर फोटो होतायत व्हायरल

मनोरंजन | बॉलिवुड म्हंटल की सर्व चंदेरी दुनिया या दुनियेतील स्टार्स. याच स्टार्स लोकांच्या पर्सनल आयुष्याबाबत त्यांच्या चाहत्यांना काहीना काही जाणून घ्यायचं असतंच. बॉलिवूड अभिनेता अमीर खानची मुलगी आयरा खान हील 2020 पासून एक मराठी मुलगा डेट करत आहे. त्याच नाव नुपूर शिखरे आहे. सोशल मीडियावर या दोघांचे बरेच फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

आयरा आणि नुपूरची भेट एका जिममध्ये झाली होती. त्यानंतर ते बऱ्याचदा जिममध्ये भेटले. एक हटके जोडी म्हणून ते सध्या खूपच चर्चेत आहेत. दोघांनी २०२० मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. ती सध्या सोशल मीडियावर अधिक सक्रिय असल्याने ती आपल्या सर्व गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. ती बॉलिवूडमध्ये सद्या सक्रिय नसली तरीही तिचा सोशल मीडियावर असंख्येन चाहता वर्ग आहे.

ती सतत आपल्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबतचे फोटो आणि व्हिडीओ बिनधास्त करत असते. ती बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबत सुंदर क्षण घालवताना दिसते. ती सिने सृष्टीत सक्रिय नाही, तरीही तिची लोकप्रियता एखाद्या सिनेस्टारपेक्षा कमी नाही. ती एक अशी व्यक्ती आणि स्टारकिड आहे जिला आपल्या आयुष्यात काय चाललं आहे ते तिला चाहत्यांसोबत शेअर करायला आवडतं. एवढच नाहीतर

मराठमोळ्या नुपूर शिखरेन आयरा खानला केलं प्रपोज – नुकतंच आयरा खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखर तिला प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका इव्हेंटचा आहे, जिथे नुपूर लोकांच्या गर्दीसमोर आयराला किस करतो, मग गुडघ्यावर बसून अगदी फिल्मी अंदाजात तिला प्रपोज करतो. हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. युजर्स या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स करुन आमिर खानच्या लेकीवर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *