मनोरंजन विश्वातून एक सुखद धक्का! या प्रसिद्ध अभिनेत्रीने केले गुपचूप लग्न…

मुंबई | मनोरंजन विश्वातून एक सुखद धक्का देणारी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री रुपल नंद हिने नुकतीच गुपचूप लग्न गाठ बांधली आहे. अभिनेत्रीने खूप सध्या पद्धतीने हे लग्न केले आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर आता समोर आले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना एक मोठा सुखद धक्का बसला आहे. त्यामुळे आता सर्व जण रूपलच्या लग्नाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यास खूप उत्सुक आहेत.

रूपलने १० जुलै २०२२ रोजी एका छोट्या समारंभात आपला लग्न सोहळा उरकला आहे. अनिश कानविंदे या युवकाशी तिने लग केले आहे. यावेळी लग्नाला फक्त तिचे काही जवळचे मित्र उपस्थित होते. कोणताही जास्तीचा गाजावाजा न करता या अभिनेत्रीने लग्न केले आहे. रूपल ही श्रीमंत घरची सून या मालिकेतून घराघरात पोहचली आहे. याच मालिकेत तिचा सहकलाकार असलेला अभिनेता यशोमन आपटे हा देखील तिच्या लग्नाला हजर होता. यशोमनने रूपलच्या लग्नातील काही सुंदर फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच रूपलने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आता तिच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. लग्नात तिने गुलाबी रंगाचा सुंदर असा घागरा घातला आहे. तसेच लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावर हिरव्या रंगाचा सुंदर असा मोठा नेकलेस घातला आहे. हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र यामुळे ती अधिकच सुंदर दिसते आहे. यावेळी तिने लूक पूर्ण करण्यासाठी पिंक रंगाचा मेकअप केला आहे. तिच्या पतीने यावेळी क्रीम रंगाची शेरवानी परिधान केली आहे. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसते आहे.

या अभिनेत्रीने आता पर्यंत मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुंबई पुणे मुंबई ३ या चित्रपटात देखील तिने दमदार भूमिका साकारली. तसेच श्रीमंत घरची सून मधून ती खूप प्रसिद्ध झाली. चाहत्यांना तिच्या लग्नाची बातमी समजताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर आला आहे. अनेक जण तिच्या या आंदामायी सोहळ्यात सामील होत आहेत. तसेच काहींनी या बाबत थोडी नाराजी व्यक्त केली आहे. कारण अभित्रीने या आधी लग्नाची काहीचं माहिती दिली नव्हती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *