केसांची एक पोनी बांधून स्माईल देत असलेल्या या चिमुकल्याने गाजवली आहे मराठी हॉरर मालिका …..

मुंबई| आपण कितीही मोठे झालो, कितीही सुंदर दिसत असलो तरी देखील बालपणीच्या फोटोंची बताच ओर आहे. कारण या वयात आपल्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त निरागस हसू असते. बालपण हे काही परत मिळत नाही. मात्र बालपणीच्या फोटोंमुळे आपल्या जुन्या आठवणी नेहमीच ताज्या होतात.

तर सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याचा बालपणीचा फोटो खूप व्हायरल होतं आहे. या अभिनेत्याने सध्या मराठी मालिका विश्व चांगलेच गाजवले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. तसेच या अधिनेत्याने काही दिवसांपूर्वीच मालिका विश्वात पदार्पण केले आहे.

फोटोमध्ये या चिमुकल्याने गुलाबी रंगाचे एक टीशर्ट आणि छोटी पँट घातली आहे. तसेच निळ्या फ्रॉकमध्ये त्याची बहीण उभी आहे. हे दोघेही यात खूप क्यूट दिसत आहेत. विशेष म्हणजे त्या मुलाने केसांची एक पोनी बांधलेली आहे. यात तो आणखीनच गोड दिसत आहे. या फोटोवरून अनेक जण त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र जर तुम्ही त्याला ओळखू शकले नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून साईंकित कामत आहे. त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा हा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये त्याने,” मी आणि माझी बहिण” असे लिहिले आहे.

त्याच्या या सुंदर फोटोवर चाहत्यांनी तुफान लाइक्सचा वर्षाव केला आहे. सईंकितने रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या तिन्ही पर्वात अभिनय केला आहे. यामध्ये त्याने अभिराम हे पात्र साकारले होते. अभिराम हा अण्णा नाईक यांचा सर्वात लहान मुलगा असतो. त्यामुळे मालिकेत त्याचे पात्र खूप महत्त्वाचे होते. त्याने या मालिकेत दमदार अभिनय केला. तसेच प्रेक्षकांची खूप पसंती मिळवली.

हा अभिनेता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी तो चाहत्यांना शेअर करतो. सोशल मीडियावर देखील त्याचे लाखो चाहते आहेत. अशात त्याच्या प्रत्येकच फोटोवर चाहते खूप प्रेम करतात. आता त्याला आणखीन वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उस्तुक आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *