मराठी चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द विनोदी अभिनेत्याचे निधन; अभिनय क्षेत्रात शोककळा

मुंबई | त्यांनी मोरूची मावशी या नाटकातून विशेष प्रसिध्दी मिळवली. त्यांचे हे नाटक खूप चालले. यातून बक्कळ नफा देखील झाला. तसेच यांच्या एन्ट्री नंतरच हे नाटक सुरू होत होते.

या नाटकात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने जीव ओतला होता. यांनी या नंतर अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यांनी लावू का लाथ, नवरा माझा नवसाचा या चित्रपटात देखील अभिनय केला.

नवरा माझा नवसाचा या चित्रपटात त्यांनी बाबू कालिया हे पात्र साकारले होते. हे पात्र विशेष गाजले होते. यांनी या नंतर बायको असून शेजारी, लग्नाची बेडी, टूर टूर अशा अनेक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केले.

त्यांचे शालेय शिक्षण गिरगावात पूर्ण झाले. त्यानंतर मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. येथे त्यांच्या बरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक गिग्गज कलाकार शिक्षण घेत होते.

यांनी बँकेत नोकरी देखील केली. त्यांच्या आईने त्यांना सांगितले होते की, नोकरी कधीच सोडायची नाही. तसेच नाटकात काम करणे देखील थांबवायचे नाही. त्यामुळे त्यांनी सेवा निवृत्ती पर्यंत बँकेत नोकरी केली.

दिग्गज अभिनेते प्रदीप यांचे निधन झाले आहे. गिरगाव तेथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. यावेळी अभिनय क्षेत्रातील सर्वच व्यक्तींनी आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रदीप पटवर्धन हे नेहमीच स्मित भाषिक आणि भारदस्त स्वभावाचे राहिले आहेत. त्यांच्या अभिनयाने त्यांनी अनेकांची मने जिंकली. त्यांचा अभिनय नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे. तसेच मराठी कला विश्वात त्यांनी नाटक आणि चित्रपट तसेच मालिका यामध्ये काम केले आहे.

अशा या भोळ्या, मनमिळावू आणि हुशार अभिनेत्याच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वात दुःखाची लाट उसळली आहे. त्यांचे चाहते त्यांच्या निधनाने खूप दुखी आहेत. अनेक जण सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *