मराठी चित्रपटसृष्टी हादरली! अभिनेत्री अमृता खानविलकरवर पसरला दुःखाचा डोंगर

मुंबई | मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री अमृताच्या मावशीचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने याची माहिती आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करू दिली आहे. भावूक पोस्ट शेयर करत अभिनेत्रीने आपल्या मावशीला श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्या मावशीच्या निधनानंतर अमृतान केली ही पोस्ट – मावशीच्या निधनानंतर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमृता खानविलकरने लिहिलं, “आता शांत झोप माझी माउली आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही मनसोक्त आईसक्रीम खा… छान रहा… नीट रहा आणि कसलीच काळजी करू नकोस आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील.

तू परत लहान होऊन जा… तू आज पर्यंत जे जे केलस घरच्यांसाठी… आमच्या कुटुंबासाठी त्याची परतफेड आम्ही कोणी करूच शकत नाही. मम्मा, मी, अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर नाहीतर आम्ही हरवलो असतो. माऊ तुला खूप मिस करणार गं तुला…. अजून आपल्याला किती फिरायचं होतं. बोलायचं होतं… मॉमला, मला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं. पण माऊ तू नीट राहा आता. तू काळजी करू नकोस.”

तिने पुढे लिहिले की, आज मी तुला ज्या प्रकारे पाहिलं ते पाहून मी सुन्न झालीय….मला मावशीपेक्षा तू माझ्यासाठी आई होतीस…. तुला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाताना आणि तरीही खंबीरपणे उभं राहून कुटुंबासाठी गोष्टी करताना पाहून मला स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव झाली.

आम्हाला स्वतःच्या हातांनी खाऊ घालण्यापासून ते मला आणि अदितीला आमच्या करिअरमध्ये प्रोत्साहन देण्यापर्यंत नेहमीच तुझी साथ राहिली. या जगाच्या शेवटपर्यंत मला तुझी आठवण येईल. तू केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी आभारी आहे. आईची काळजी करू नको. मी घेईन तिची काळजी. माऊ, तुझ्या आत्म्याला शांती मिळो.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *