धक्कादायक! धर्मवीर चित्रपट निर्मात्याच्या गाडीचा अपघात 

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते तसेच अभिनेते मंगेश देसाई यांच्या गाडीला काल अपघात झाला. हा अपघात तितकासा भीषण नव्हता. त्यामुळे गाडीतील कोणालाच काहीच दुखापत झाली नाही. मात्र यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. सदर घटना ही सायन – पनवेल महामार्गावरील कोकण भवन येथे घडली आहे.

धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई हे आपल्या चारचाकी गाडीने कर्जतला फिरायला चालले होते. त्यावेळी गाडीत त्याच्या बरोबर त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने मंगेश यांची कार त्या गाडीला जोरात धडकली. त्यामुळे यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले. मात्र इतर कुणालाही कोणतीच इजा झाली नाही.

ही घटना समजताच त्यांना चाहत्यांचे तसेच इतर नातेवाईकांचे आणि कलाकारांचे फोन येऊ लागले. यामध्ये त्यांना काही दुखापत झाली आहे का? ते ठीक आहेत की नाही याची काळजी सर्वांना लागली. येणारे फोन आणि मॅसेज जास्त वाढत असल्याने त्यांनी एका व्हिडिओ मार्फत सर्व घटनेची तपशीलवार माहिती चाहत्यांना आणि निकटवर्तीयांनी दिली आहे. यामध्ये ते म्हणालेत की, “तुमच्या सर्वांच्या सदिच्छा असताना, गणपती बाप्पा माझ्यासोबत असताना मला काहीही होऊ शकत नाही. मी सुखरुप आहे. छोटासा अपघात झाला होता. गाडी थोडी खराब झाली. मला तसेच माझ्या कुटुंबियांना काहीही दुखापत झालेली नाही. मला भरपूर फोन कॉल्स आले. काळजी करण्यासारखे काही नाही,” असं ते म्हणाले आहेत.

तसेच त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर देखील एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” आज झालेल्या अपघातामध्ये फक्त गाडीचे नुकसान झालेले आहे, ईश्वराच्या कृपेने आम्ही सुखरूप आहोत काळजी नसावी, धन्यवाद! ” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *