मन उडू उडू झालं फेम अजिंक्य आणि तेजश्री प्रधान आले एकत्र; या प्रोजेक्टमध्ये करतायत काम

मुंबई | मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकार एकदा का प्रसिद्ध झाले की, मग त्यांच्या पुढे अन्य प्रेजेक्टची रांगच लागते. अशात मन उडू उडू झालं या मालिकेत अजिंक्य राऊत आणि हृता हे दोन्ही कलाकार खूप हिट झाले आहेत. हृता तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीत यशाच्या उंच शिखरावर पोहचली आहे. अशात अजिंक्य देखील आता मोठी झेप घेताना दिसतो आहे.

अजिंक्य राऊत हा अभिनेत्री तेजश्री प्रधान बरोबर एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहे. त्याने यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. तेजश्री प्रधान ही अभिनेत्री तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतून तिने खूप प्रसिध्दी मिळवली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.

होणार सून मी या घरची या मालिकेतून तिने अफाट प्रसिध्दी मिळवली. याच मालिकेत काम करत असताना ती मालिकेतील शशांक केतकर या अभिनेत्याच्या प्रेमात पडली. लगेचच या दोघांच्या लग्नाची बातमी देखील समोर आली होती. दोघांनी लग्न केल्याने चाहते देखील खूप खुश होते. तसेच हे दोघे देखील त्यांच्या सुखी संसारात मग्न होते.

मात्र संसाराच सुख तेजश्रीच्या आयुष्यात फार काळ नव्हतं. या दोघांचा काही दिवसांतच घटस्फोट झाला. नंतर शशांक केतकरने प्रियंका ढवळे बरोबर लग्न केले. मात्र तेजश्री अजूनही सिंगल आहे. मात्र तिने याचा परिणाम तिच्या करियरवर होऊन दिला नाही. तिने होणार सून मी या घरची या मालिकेनंतर अग बाई सासू बाई ही मालिका देखील गाजवली. अशात ती सध्या काय करते या मराठी चित्रपटात देखील ती झळकली.

या चित्रपटामध्ये तिने अंकुश चौधरी बरोबर स्क्रीन शेअर केली होती. तिच्या या चित्रपटातील अभिनयाला देखील अनेकांची दाद मिळाली. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये देखील नशीब आजमावले. बबलू बॅचलर या चित्रपटात ती दिसली. यामध्ये तिने काही हॉट सीन दिले होते. त्यामुळे सगळीकडेच तिच्या अभिनयाची वाहवा झाली. तसेच तिला ट्रोल देखील केलं गेलं.

अशात आता तेजश्री आता अजिंक्य बरोबर एका प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. एका कंपनीच्या जाहिरातीमध्ये हे दोघे एकत्र दिसणार आहेत. तसेच यामध्ये या दोघांबरोबर एक कोटी मुलगी देखील असणार आहे. नुकतेच या जाहिरातीचे शुटींग पूर्ण झाले असून याचे काही फोटो समोर आले आहेत. ही जाहिरात स्टेट नावाच्या एका ॲपची आहे. अजिंक्य आणि तेजश्री यामध्ये एकत्र दिसणार असल्याने या दोघांचे चाहते देखील खूप खुश आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *