माईने केले असे काही की, जयदीपला बदलावा लागला घर सोडून जाण्याचा निर्णय….

मुंबई| सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गौरी आणि जयदीप यांच्यावर सुखाचे वारे वाहत होते. मात्र आता एका घटनेमुळे गौरी आणि जयदीप यांनी शिर्के पाटलांचे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. सतत होत असलेला अपमान जयदीपला सहन न झाल्याने त्याने आपल्या पत्नी बरोबर हा निर्णय घेतला.

जयदीप आणि गौरी हे दोघेही शिर्के पाटील यांच्या घराचे खरे वारसदार आहेत असे माई आणि दादा नेहमी बोलत असतात. आतापर्यंत गौरी या घरची सून होती. मात्र अम्माने एक मोठा खुलासा केला. तिने सांगितले की गौरी ही माई आणि दादांची लेक आहे. जयदीप त्यांचा मुलगा नाही. यावरून मालिकेत एकच खळबळ उडाली होती. मात्र या सर्व बदलांचा स्वीकार करत गौरी आणि जयदीप गुण्यागोविंदाने नांदत होते. हे सर्व शालिनीला अजिबात बघवले नाही. त्यामुळे तिने रेणुकाच्या मदतीने एक कट रचला.

रेणुका ही माई आणि दादा यांची मोठी मुलगी आहे. तर गौरी ही माई आणि दादा यांची धाकटी मुलगी आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जयदीप माई आणि दादा यांचा मुलगा म्हणून शिर्के पाटलांच्या घरात राहत होता. तसेच गौरी ही सून बनवून या घरात राहत होती. वर्षानुवर्षे हे दोघे याच घरात राहत असल्याने. आता गौरीला शिर्के पाटलांची खरी वारसदार म्हणून घोषित केले गेले. त्यामुळे शालिनीने रेणुकाच्या मदतीने मोठा डाव रचला. यावेळी रेणुकाने सर्वांना सांगितले की, मी या घरची मोठी लेक आहे तरी देखील सर्व मान गौरीला देता. ते सर्व ठीक आहे पण गौरी या घरची लेक आहे तरी देखील जयदीप या घरामध्ये कसा काय राहतो. गौरीचा नवरा या घरचा घर जावई आहे का?

तिच्या या वक्तव्यावर जयदीपचा खूप अपमान होतो. त्यामुळे जयदीप घर सोडून निघून जातो. मात्र त्याचवेळी माई घरी येतात. या सर्व प्रकरणात गौरी आई होणार असल्याची बातमी देखील समोर येते. अशा परिस्थितीत देखील जयदीप घर सोडून जाण्याच्या निर्णयावर ठाम राहतो. यावेळी माई त्याच्या जोरदार कानामागे लगावते. मात्र तरीदेखील तो घर सोडून जाण्याच्या निर्णयावर ठाम असतो. तो घरातून बाहेर पाऊल ठेवत असताना माई त्याचा हात पकडते तसेच रडत रडत त्याच्यासमोर पदर पसरते. आईची आपल्यासाठी असलेली ओढ पाहून जयदीप चे मन देखील गहिवरून येते. त्यामुळे तो आपला निर्णय बदलतो. त्याचा बदललेला निर्णय हा या मालिकेच्या एका प्रोमो व्हिडिओमध्ये दिसला आहे. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.

यामध्ये जयदीप आणि गौरी पुन्हा एकदा शिर्के पाटलांच्या घरात राहणार असं दिसत आहे. आता या सर्वांमुळे पुन्हा एकदा शालिनीने रचलेला डाव फासला आहे. त्यामुळे आता शालिनी पुढे काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *