महेश मांजरेकर यांच्या मुलगा दिसतो खुपचं देखणा; करतो हे काम

मुंबई | मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आजवर अनेक चित्रपट साकारले आहेत. महेश मांजरेकर यांच्या मुलींबद्दल अनेक व्यक्तींना माहित आहे. त्यांच्या दोन्ही मुली सिने विश्वात सक्रिय आहेत. अशा त्यांची एक मुलगी आता दे धक्का २ मध्ये देखील दिसणार आहे.

मांजरेकर यांनी त्यांच्या स्वतःच्या निर्मितीसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्षितीज नावाच्या दूरदर्शन मराठी मालिकेत ते पहिल्यांदा दिसले होते. ज्यामध्ये त्यांनी कुष्ठरुग्णाची भूमिका केली होती. 2002 मधील कांते चित्रपटातील अभिनयासाठी त्यांनी वाहवा मिळविली आणि नंतर तमिळ चित्रपट अरम्बम, तेलगू चित्रपट ओक्कादुन्नाडू आणि स्लमडॉग मिलेनियर चित्रपटात गँगस्टर जावेद म्हणून नकारात्मक भूमिका केल्या . मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या मराठी चित्रपटात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती.

आखरी चुनौतीमध्येही त्यांनी हरपीज डोंगराची भूमिका साकारली होती. वाँटेड चित्रपटातील इन्स्पेक्टर डी.आर. तळपदेच्या भूमिकेसाठी मांजरेकर यांची प्रशंसा झाली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर पश्चिम मुंबईतून मनसेचे उमेदवार होते पण शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

महेश मांजरेकर यांना गौरी इंगवले आणि सई मांजरेकर अशा दोन मुली आहेत. मात्र त्यांच्या मुलाबद्दल जास्त व्यक्तींना माहित नाही. महेश मांजरेकर यांना एक मुलगा देखील आहे. त्याचं नाव सत्य मांजरेकर असं आहे. सत्य मांजरेकर देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. सत्याने बालकलाकार म्हणून ‘आई’ या चित्रपटामधून पदार्पण केले.

त्याने ‘वाह! जीवन हो तो ऐसी! मध्ये काम केले. तसेच साल 2017 च्या ‘FU: Friendship Unlimited’ या चित्रपटाशीही तो जोडला गेला होता. ‘आई’ (1995) या मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून त्याने पहिली ऑन-स्क्रीन भूमिका केली. सत्य मांजरेकरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळाली. त्याने यूट्यूब आणि त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर देखील अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

सत्य मांजरेकरचा जन्म मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झाला. त्याला त्याचे वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवणे आवडते. तो त्याच्या स्टाईलसाठीही ओळखला जातो. तो अगदी लहान वयातच त्याच्या व्हिडिओद्वारे आपली छाप उमटवण्यात सफल ठरला आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *