महेश मांजरेकर बिग बॉसमधून पडले बाहेर; सिद्धार्थ जाधव करणार बिग बॉसमध्ये होस्टिंग

मुंबई | टीव्ही मालिका मधील बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत टीव्हीवरील सर्व कार्यक्रमांमधील बिग बॉस या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे सर्वाधिक मनोरंजन केले आहे. नुकतेच बिग बॉस मराठीच्या चौथ्या परवाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर सर्वच प्रेक्षक वर्ग खूप खुश झाला आहे.

अशात गेल्या तिन्ही सीजनमध्ये आपण महेश मांजरेकर यांना बिग बॉस होस्ट करताना पाहिले. अशात चौथ्या सीझनमध्ये देखील तेच होस्ट करतील असं म्हटलं जात होतं. माध्यमांवर महेश मांजरेकर आणि बिग बॉस यांच्या विषयी सुरू असलेल्या चर्चा पाहता त्यांनी एक खुलासा केला आहे.

बिग बॉसच्या चौथ्या पर्वामध्ये ते सूत्रसंचालन करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. याचे कारण सांगताना ते म्हणाले की, ” बिग बॉसच्या तीन सीजन बरोबर माझं कॉन्ट्रॅक्ट साईन झालं होतं. आता माझं कॉन्ट्रॅक्ट संपलेल आहे त्यामुळे चौथ्या पर्वामध्ये मी नसणार. महेश मांजरेकर यांनी दिलेल्या या माहितीनंतर आता बिग बॉसच्या चौथा सीजनचे सूत्रसंचालन कोण करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये आपल्याला अभिनेता सिद्धार्थ जाधव सूत्रसंचालन करताना दिसू शकतो. सोशल मीडियावर सध्या अशीच चर्चा सुरू आहे. मराठी सिनेसृष्टीतील सिद्धार्थ जाधव हा एक नामवंत अभिनेता आहे. महेश मांजरेकर यांच्या नंतर बिग बॉसची खुर्ची तो सांभाळताना दिसणार आहे.

माध्यमांवर सुरू असलेल्या या चर्चांमध्ये अद्याप बिग बॉस अथवा सिद्धार्थ जाधव कडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्रा आणि चाहत्यांना देखील असे वाटत आहे की, सिद्धार्थ जाधवने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावे. सिद्धार्थने आतापर्यंत फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टी देखील चांगलीच गाजवली आहे.

आजवर त्याने अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. तो एक बहुआयामी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. लवकरच बॉलीवूडच्या सर्कस या चित्रपटामध्ये सिद्धार्थ झळकणार आहे. तसेच दे धक्का २ बहूप्रतिक्षित चित्रपटांमध्ये देखील त्याचा दमदार अभिनय पाहता येईल.

बिग बॉस हा कार्यक्रम आतापर्यंत नेहमीच एक मोठा वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. बिग बॉस मराठीचे तीनही पर्व खूप छान पद्धतीने गाजले. यामध्ये असलेली मजा मस्ती तसेच स्पर्धकांची एकमेकांबरोबर असलेली चढाओढ पाहण्यामध्ये एक वेगळीच रंगत आहे. आतापर्यंत बिग बॉस मराठीच्या तिन्ही पर्वानी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अशात आता बिग बॉस 4 मध्ये नेमके कोणकोणते स्पर्धक दिसतील याची देखील चर्चा होत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *