फक्त ५०० रुपयांसाठी आलिया भट्ट कडून महेश भट्ट करून घेत होते हे घाणेरडं काम

मुंबई | बॉलीवूड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक महेश भट्ट हे त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच खाजगी आयुष्यामुळे देखील मोठ्या चर्चेत राहिलेले आहेत. त्यांची मुलगी पूजा भट्ट बरोबर त्यांनी एका मासिकासाठी लीप लॉक किस सीन शूट केले होते. तेव्हापासून अनेक वेळा ते आपल्या मुलींमुळे वादाच्या विळख्यात अडकताना दिसले आहेत. बॉलीवूडमध्ये चित्रपटांच्या कारकिर्दीत यशाची मोठी मजल मारली असली तरी खाजगी आयुष्यामुळे नेहमीच त्यांच्यावर टीका झालेली आहे. बाप आणि मुली मधील हा एक संभ्रम आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आलिया भट्टने नुकतेच रणबीर कपूर बरोबर लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यानंतर लगेचच तिने गोड बातमी दिली. आलियाच्या आयुष्यात चित्रपटांची लागलेली रांग आणि तिच्या वैवाहिक आयुष्यमुळे ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहते. सध्या तिच्या आयुष्यामध्ये तिने मोठा विजय मिळवलेला आहे. चित्रपटांच्या कारकिर्दीबरोबरच तिचं वैवाहिक आयुष्य देखील सफल होताना दिसत आहे. यामुळे तिचे चाहते देखील तिच्यावर प्रचंड खुश आहेत.

या सर्वांमध्ये आलिया ही तिच्या वडिलांना कधीच वडील मानत नाही अशी चर्चा सुरू आहे. यावर महेश भट्ट यांनी स्वतः एका माध्यमाशी संवाद साधताना उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की, ” माझी आलिया आता खूप मोठी झाली आहे. ती लहान होती त्यावेळी मी तिला ५०० रुपयांसाठी माझ्या पायाला तेल लावून मालिश करून द्यायला सांगायचो. मात्र आता माझी मुलगी खूप मोठी झाली असून मी तिच्या वयात जेवढे पैसे पाहिलेही नव्हते तेवढे ती आता कमवत आहे. मला तिचा खूप हेवा वाटतो. ”

आलिया तिच्या वडिलांना कधीच वडील मानत नाही यावर प्रश्न विचारण्यात आल्यावर महेश भट्ट यांनी उत्तरामध्ये सांगितले की, ” ती माझी मुलगी असली तरी ती करण जोहरला वडिलांचा आदर देते. ती त्याचा खूप आदर करते. त्यामुळे ती माझ्या ऐवजी करणला वडिलांचा प्रथम दर्जा देते आणि मला द्वितीय.” असे त्यांनी सांगितले. बाप लेकीच्या या नात्याची आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटामध्ये अभिनय केल्यानंतर आलियाच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली. आपल्या पहिल्याच चित्रपटामधून तिने यशाला गवसणी घातली. त्यानंतर तिने राजी, २ स्टेट, उडता पंजाब, ये दिल हे मुश्किल, डियर जिंदगी, गली बॉय अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. लवकरच ती ब्रह्मास्त्र आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तसेच हॉलीवुड मधील हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटामध्ये देखील तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *