महाराष्ट्र हादरला ! सख्ख्या छोट्या भावानेच मोठ्या भावाच्या डोक्यात घातली कु’ऱ्हा’ड; कारण जाणून धक्काच बसेल

बारामती | प्रत्येक कुटुंबामध्ये घरगुती वाद होतच असतात. जमिनीवरून, संपत्तीवरून प्रत्येक घरातील भावभावांमध्ये मतभेद असतात. प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात. त्यामुळे वाद हे कुणालाच चुकलेले नाहीत. मात्र सध्या भावाभावांमधील एका किरकोळ वादातून धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेमध्ये लहान भावाने मोठ्या भावाचा जीव जाईपर्यंत त्याला मारहाण केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घरगुती किरकोळ वादातून सुरुवातीला या दोन भावांमध्ये भांडणे सुरू झाले.

घरामधील आणि किरकोळ वाद असल्याने त्यांना सोडवण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. मात्र दोघांच्या मनामध्ये राग विकोपाला गेला होता. त्यामुळे या रागाचे रूपांतर पुढे हाणामारीमध्ये झाले. ही हाणामारी इतकी वाढली की या दोघांनी एकमेकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये लहान भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र मोठ्या भावाच्या डोक्यावर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोघांमधील हा वाद अक्षरशः थरकाप उडवणारा होता.

बारामती तालुक्यातील मोढवे परिसरातील मोटेवाडी येथे ही घटणा घडली आहे. यात तायअप्पा मोटे असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा लहान भाऊ रामा मोटे जखमी झाला आहे. हे दोघे देखील प्रौढ वयातील आहेत.

तायअप्पा यांच्या इथून शेताकडे जाणाऱ्या वाटेवर रामा यांनी लाकडाचे मोठे ओंडके ठेवून रस्ता बंद केला होता. यावेळी मोठ्या भावाने छोट्या भावाला या विषयी जाब विचारला त्यावेळी त्याने नीट उत्तर न दिल्याने या दोघांमध्ये मोठी भांडणे सुरू झाली.त्यानंतर हे दोघे एव्हढे चिढले होते की, त्यांनी एकमेकांवर कुऱ्हाडीचा घाव घातला. यामध्ये मोठ्या भावाच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर छोट्या भावाच्या डोक्यावर मार न लागता पायावर मार लागला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.

अशात मृत पावलेल्या तायअप्पा यांची सून लक्ष्मी महादेव मोटे हिने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आपल्या चुलत सासऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या रामा मोटे हे जखमी असल्याने त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र ते ठीक झाल्यास त्यांना अटक करण्यात येईल असे म्हटले जात आहे.

घडलेल्या घटनेबद्दल आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ही त्या दोन भावांची भांडणे होती. त्यामुळे आम्ही कुणी मध्ये पडलो नाही. मात्र त्यांची ही अशी भांडण्याची पाहिली वेळ नव्हती. अनेक वेळा त्यांचे कौटुंबिक वाद होत असतात. जमीन आणि संपत्ती वरून देखील त्यांचे अनेक वाद आहेत. त्यामुळे त्यांच्यात नेहमी हाणामारी व्हायची. मात्र छोटा भाऊ असे काही करेल याची आम्हाला कल्पना नव्हती. या घटनेने आम्ही देखील चकित झालो आहोत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *