माधुरी दीक्षितने तिच्या आयुष्यातील हे काळे सत्य अजूनही ठेवले आहे दडून

मुंबई | बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या प्रेम कहाण्या यातून नेहमीच वेगवेगळे खुलासे होत असतात. हे खुलासे ऐकून अनेक चाहते गडबडून जातात. हे खरचं असेल का? असे प्रश्न त्यांच्या मनात येतात. बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत काहीच अशक्य नाही. इथे कोणीही कुणावरही प्रेम करू शकते. कारण चित्रपटात काम करताना कलाकार एकमेकांच्या खूप जवळ असतात. अशात आता बॉलीवूड मधील एका प्रसिद्ध अभिनेत्री विषयी तिच्या भूतकाळातला एक मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

या अभिनेत्रीने 90 च्या दशकांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आजही तिला धक धक गर्ल म्हणून ओळखले जाते. या अभिनेत्रीने तिच्यापेक्षा वयाने लहान आणि तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अनेक कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करत कामे केली आहेत.

अभिनय क्षेत्रातील तिच्या डान्स मुळे नेहमीच तेच कौतुक करण्यात आलेले आहे. या अभिनेत्रीचे नाव कदाचित आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेल. हो धक धक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित याच अभिनेत्री बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

गेली तीन दशके माधुरीने बॉलीवूड वर अधिराज्य गाजवले. आजही अनेक रियालिटी शो मधून तिच्या डान्सची झलक पाहायला मिळते. एक काळ होता जेव्हा माधुरीचे नाव संजय दत्त बरोबर जोडले जात होते. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर करत अभिनय केला होता.

या दोघांची जोडी त्याकाळी प्रचंड गाजली होती. या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे अशी देखील चर्चा उडाली होती. साजन या चित्रपटाच्या शूटिंग वेळी हे दोघे एकत्र आले होते. दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटानंतर माधुरी आणि संजय दत्त या दोघांनी खलनायक या चित्रपटामध्ये देखील अभिनय केला.

या काळामध्ये माधुरी आणि संजय दत्त या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केले गेले आहे. त्याकाळी सोशल मीडिया जास्त वापरात नसले तरी देखील माध्यमांवरती या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.

हे दोघेही काही काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र संजय दत्त सतत दारू प्यायचा आणि रात्र रात्र पार्टीमध्ये असायचा. ही गोष्ट माधुरीला अजिबात आवडत नव्हती. त्यानंतर मुंबईवर झालेला आतंकवादी हल्ला दरम्यान संजय दत्त कडे काही शस्त्रसाठा सापडला होता.

त्यानंतर त्याला अटक करण्यात आली यावेळी या दोघांचे नाते संपुष्टात आले असे म्हटले जात आहे. मात्र या दोघांचे नाते संजय दत्तने आधीच संपवले होते. त्याला असलेले दारूचे व्यसन माधुरीला अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे या दोघांमध्ये आधीच भांडण सुरू झाली होती.

संजय दत्तचा आयुष्यावरती संजू हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यावेळी या चित्रपटामध्ये संजय दत्तच्या आयुष्यात असलेल्या अनेक अफेअरवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी माधुरीने दिग्दर्शकांना विनंती केली होती की माझे आणि संजय दत्तचे नाते चित्रपटात अजिबात दाखवू नका. राजकुमार हिरानी यांनी देखील तिची ही विनंती मान्य केली होती. चित्रपटात डान्सिंग क्वीन म्हणून करिश्मा तन्ना आपल्याला अभिनय करताना दिसली.‌ हे पात्र माधुरीचे होते अशी चर्चा सुरू होती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *