प्रेम प्रकरण! घोड्यावर बसण्याच्या ऐवजी नवरदेवाला चीतेवर लागलं बसायला; नवरदेवासह एकाचा मृत्यू, वाचून डोळ्यात पाणी येईल

बंगळुरू | कर्नाटकमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मोठा वाद चिघळला आहे. वधू आणि वर या दोघांनी प्रेम विवाह केला. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी मोठे भांडण केले आहे. दोन्ही जातीतील गटामध्ये जंगी मारहाण झाली आहे. यात दोन व्यक्तींचा मृत्यू देखील झाला आहे.

सदर घटना ही गांगवती शहराजवळील कनकगिरी तालुक्यातील हुलीहैदर गावात घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे. आंतरजातीय विवाहामुळे ही हाणामारी झाली असल्याचे समजले आहे.

या हाणामारीत वाद खूप विकोपाला पोहचला आणि यात दोन व्यक्तींचा जीव देखील गेला. यामध्ये पशावली मोहम्मद साबा (27), यंकप्पा शामप्पा तलवार (44) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. पशावली मोहम्मद साबा हा वर होता. लग्न झाल्यानंतर वाद वाढल्याने तो यंकप्पा यांच्याकडे येऊन शिवीगाळ करू लागला. नंतर या दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली.

त्यामुळे वधू आणि वर यांच्या गटातील सर्व व्यक्ती एकमेकांवर तुटून पडले. प्रेमात असलेल्या या वधू आणि वराचा यात काहीच दोष नव्हता. फक्त त्यांची जात वेगळी असल्याने हा अमानुष प्रकार घडला आहे. ही घटना खूप निंदनीय आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. तसेच गावात १४४ कलम लागू केले आहे. वाद आणखीन वाढून जीवित हानी होऊ नये यासाठी पोलिसांनी कायदेशीर कलम लावले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *